Halloween party ideas 2015


कळमसरे येथील सिमेंट बंधाऱ्याना  गळती------ 
पहिल्याच पावसात  अडविन्यात येणारे पाणी गेले वाहून

अमळनेर प्रतिनिधी

 कळमसरे येथील शेत परिसरात यावर्षी भूजल सर्वेक्षण अंतर्गत सिमेंट बंधारे बांधन्यात आले आहेत.मात्र ठेकेदाराच्या निकृष्ठ कामामुळे पहिल्याच पावसात पडलेले पाणी अडविले न गेल्याने ते वाहून गेल्याने कळमसरे येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त  केला आहे.
            दरवर्षी अत्यल्प होणाऱ्या पावसामुळे वाहून जाणारे पाणी अडवून ते त्याच ठिकानीच जिरविले जावे यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेत शासन दरवर्षी लाखो रुपयांचा निधीची तरतूद करून खर्च करीत असून शासनाने मंजूर केलेला सिमेंट बंधाऱ्याचे थातुर मातुर बांधकाम करण्यात आल्याने ठेकेदार कडून शासनाचा मलिदा लाटुन घेण्यात आल्यावर पाणीतर अडविले गेलेच नाही उलट त्या त्याला खालून गळती लागली आहे.परिणामी या बंधार्यात पावसाचे अडविलेले पाणी वाहून गेल्याने शेतकरींनी संताप व्यक्त करीत वेळीच या बंधार्याची गळती न थांबविल्यास याबाबत संबधीताचा पाठपुरावा करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
         परिसरात कुठेच जवळपास पाण्याचा स्त्रोत नसल्याने विहिरी कोर्ड्या पडल्या आहेत.मात्र या सिमेंट बंधार्या मुळे पाणी अडविल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत जिरविले जाणार आहे.शासनाने लाखो रूपयानाचा निधी खर्च करून पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी खर्च करीत असून संबधित अधिकार्याच्या दुर्लक्ष पणामुळे निकृष्ठ काम होत असल्याने पहिल्याच पावसात बऱ्याच बँधार्याचे पाणी वाहून गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

          सिमेंट बंधाऱ्याना बारदान व मातीचा लेप------
        पावसाळा सुरू होताच पडलेले  पाणी बंधरा खालून वाहून गेल्याने शेतकरींची तक्रार गेल्याने संबधीत ठेकेदार यांनी या गळती होत असलेल्या बंधाऱ्याला माती टाकून बारदान लावून दगडांचा भराव करून  गळती थांबेल म्हणून या सिमेंट बढाऱ्यांच्या भिंती जवळ बारदान आडवे लावून काळी माती दगड, टाकण्याच्या प्रयत्न केला असता यावेळी शेतकरींनी वेळीच विरोध करीत याजागी गळती होत असलेल्या भागाजवळ खडी रेती ,सिमेंट मिश्रित माल टाकून तो दुरुस्त करण्यात यावा व संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनीही डोळेझाक करून सरकारी निधीचा अपव्यय केला म्हणून चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी कळमसरे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.ती न झाल्यास वरिष्ठ कडे तक्रार करण्यात येईल असेही यावेळी शेतकरींनी सांगितले आहे. असे न झाल्यास शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.