समुपदेशनाच्या उजेडाने आला रुळावर
अमळनेर प्रतिनिधी
संशयाने अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आपण पाहिलेले आहेत . अश्या संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या एका संसाराचा गाडा मार्गस्थ करण्यात महिला अन्याय विरोधी समितीला यश आले आहे . दुभंगलेला संसार पुन्हा उभारण्याचे सत्कार्य केल्यामुळे समुपदेशन करणाऱ्या महिला अन्याय विरोधी समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे .
4 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या ह्या जोडप्याची कहानीच विलक्षण आहे .दोघे एकमेकांना जीवापाड प्रेम करीत चार वर्षे सुखी नांदत असतांना कविताला ( नाव बदललेले ) तिचा पती सुजय चे संबंध सख्या आते बहिणीशी असल्याचे निनावी पत्र मिळाले आणि म्हणता म्हणता चार वर्षांचा सुखी संसार कोलमडून पडला . कविताने तडक महेर गाठले व समाज , पंच व कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या.
एक निनावी पत्राने मुलाच्या संसाराची राखरांगोळी होत असल्याचे पाहून वडिलांनी सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांच्याशी संपर्क साधून मार्ग सुचवण्याची विनंती केली . धनंजय सोनार , प्रा.निशा विसपुते , अनिल चौधरी यांनी दोन्ही परिवाराची भेट घेऊन सत्य जाणून घेऊन शास्त्रीय समुपदेशन केले . आते बहिणीशी असलेला सबंध ही केवळ निखळ मैत्री असून कुणीतरी सुखी संसाराला दृष्ट लागावा व त्याला दोन्ही गटांची माफी मागावी लागली .
एक पत्राने निर्माण झालेला कविता व सुजय यांच्यातील दुरावा संपवून पुन्हा त्यांच्या संसाराचा गाडा मार्गस्थ करणाऱ्या महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार , प्रा.निशा विसपुते (धुळे) , अनिल चौधरी, अनिल पाटील , इंद्रावर्धन सोनवणे (नाशिक) यांचे अभिनंदन होत आहे . समाज विघातक प्रकृती किरकोळ कारणावरून जुळलेली मने तोडण्याचा प्रयत्न करतात , खात्री न करता संबंध तोडू नये व परस्परांवर विश्वास ठेवावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले .