Halloween party ideas 2015



अनिल दादा तुम्ही फक्त लढ म्हणा,,,आता फक्त माझ अमळनेर आणि माझा उमेदवार,,

वाढदिवसामित्त शेकडो कार्यकर्त्यानी व्यक्त केल्या भावना,सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

अमळनेर-अमळनेर मतदार संघात शहर व ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिक आता जागृत झाला असून,परक्याना आपले आणि आपल्याना परके केल्याचे मोठे परिणाम आम्ही गेली साडेचार वर्ष भोगले आहेत,यामुळे आता फक्त माझं अमळनेर आणि माझा उमेदवार एवढीच भावना प्रत्येकाच्या मनात असून तुम्ही फक्त नकारात्मक निर्णय न घेता लढायची भूमिका घ्या अश्या प्रेमरुपी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो हितचिंतक,कार्यकर्ते,शेतकरी बांधव,व्यापारी,नोकरदार वर्ग आणि राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यानी व्यक्त करत विधानसभा निवडणीसाठी साकडे घातले. 
             अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काल सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती,विशेष करून यात ग्रामिण भागातील मंडळींसह युवा कार्यकर्त्याची संख्या लक्षणीय होती,विशेष म्हणजे दिवसभर पावसाची झिमझीम असताना देखील येणाऱ्यांची गर्दी ओसरली नव्हती,शुभेच्छा देण्यासाठी येणारा प्रत्येक जण केवळ शुभेच्छा न देता उमेदवारीचे साकडे घालताना दिसून येत होता,काही जेष्ठ मंडळीनी तर विजयी भव चे आशीर्वाद देऊन आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या.काही तरुण मंडळींच्या घोळक्यांनी शुभेच्छा देताना एकप्रकारे घेराव घालत तुम्ही उमेदवारी करणार असा शब्द आम्हाला आताच द्या असा आग्रह धरला,त्याशिवाय येथुन आम्ही हलणार नाहीत असाही पवित्रा घेतला मात्र अनिल पाटील यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता केवळ त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केल्या,यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.
          दरम्यान प्रत्येक निवडणुकीत वारंवार होत असलेला बाह्य व्यक्तींचा शिरकाव,स्थानिकांकडून दिले जाणारे प्रोत्साहन आणि आर्थिक प्रलोभने यामुळे अमळनेर मतदार संघातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून स्थानिक नेते अलिप्त होऊ लागले आहेत,अश्याताच दमदार नेतृत्व म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते अनिल पाटील देखील यंदाची विधानसभा निवडणुक लढविणार नाहीत असा संदेश गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू झाल्याने अनेकांना धंक्का बसला,यामुळे वाढदिवसाचे निमित्त साधत अनेकानी शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी भेट देऊन दादा तुम्ही लढा,,तुमच्यासाठी नव्हे तर आमच्यासाठी व या भूमीसाठी लढा,असा अट्टहास धरला.यावेळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
          शुभेच्छा देण्यासाठी येताना हार बुके ऐवजी वृक्ष आणण्याचे आवाहन केले असल्याने या आवहनास अनेकांनी प्रतिसाद देत वृक्ष आणून अनिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या,कार्यकर्त्यांच्या माध्यमातून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.अनिल पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मतदार संघसह जिल्ह्यातील नेत्यांनीही प्रत्यक्ष येऊन शुभेच्छा दिल्या,तर अनेकांनी भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्यात,यात सर्व पक्षीय नेते व पदाधिकार्यांचा समावेश होता.राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, मा.प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,ना धनंजय मुंडे,पालकमंत्री गिरीश महाजन,राज्यमंत्री गुलाबराव पाटील,माजी मंत्री एकनाथराव खडसे,सुरेशदादा जैन,माजी मंत्री आ डॉ सतीश पाटील, खा.उन्मेश पाटील,आ.किशोर पाटील,मा.पालकमंत्री  गुलाबराव देवकर,मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, मा.आ.दिलीप वाघ, मा.आ.राजीव देशमुख, मा.आ.चिमणराव पाटील,मा.खा.वसंतराव मोरे, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खेळवलकर-खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण जिल्ह्यातील आमदार,जि प व जिल्हा बँकेचे पदाधिकारी आदींचा समावेश होता.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.