अमळनेर प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमित्त स्व सौ पद्मावती मुंदडा विद्यालयाचा पायी दिंडी सोहळा सद्गुरू सखाराम महाराज वाडी संस्थान येथे संपन्न झाला.यात विद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लक्षणीय सहभाग घेतला.
शालेय वेळेवर येतांना मुलांनी पांढरा सदरा, धोतर आणि डोक्यात टोपी अशी वारकऱ्यांची वेशभूषा तर मुलींनी नऊवार साडी, डोक्यावर कळस ,तुळशीवृंदावन , हाती भगवा ध्वज घेतले होते. शालेय प्रांगणात दिंडी सोहळ्याचे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. विठूमाऊलीचा जयघोष करीत विद्यालयातून बालवारकऱ्यांची दिंडी सुरु झाली. जेष्ठ शिक्षक श्री गोकुळ बोरसे यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले .अभंग आणि माऊलींचा जयघोष करत दिंडी बसस्टँड रोड,पन्नालाल चौक ,मुठे गल्ली मार्गे वाडी संस्थानात पोहचली. वाडी चौकात विद्यार्थ्यांनी रिंगण करून फुगडया घेतल्या. तसेच सौ.वंदना पाटील मॅडम यांनी गायलेल्या भजनाच्या तालावर सर्व विद्यार्थ्यांनी ठेका धरत मनमुराद आनंद लूटला.
यानंतर मंदिरात प्रवेश करून दर्शनाचा लाभ घेतला.यावेळी श्री.प्रदिप चौधरी सर आणि श्रीमती सौ.स्वाती पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय आणि दिंडीचे महत्व विशद केले.
दिंडीचे स्वागत करण्यासाठी सखाराम महाराज संस्थानाचे आदरणीय पूज्य श्री.शारंगधरजी महाराज , श्री जोशी गुरुजी , व पुजारी श्री जयदेव लाड उपस्थित होते, त्यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एस. विंचूरकर सरांनी केला. यावेळी शारंगधर गुरूजींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि परमार्थ साध्य होण्यासाठीचा मार्ग कोणता व त्याचे फायदे , व वाडी संस्थान चे कार्य या विषयी मार्गदर्शन केले.पुजारी जयदेव लाड यांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिनी च्या वेशभूषा साकारणारे चि दक्ष महाजन व कु हेमांगी पाटिल. . यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थानाकडून सर्व शिक्षक वृंदांचा स्नेह भेट देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.पी.एस. विंचूरकर सर यांनी वाडी संस्थानाने केलेल्या कार्या बद्दल गौरोवोदगार काढले
विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.गोकुळ बोरसे यांचे कडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून दिंडी सोहळ्याची गोड सांगता करण्यात आली. या उपक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ वंदना पाटील ,श्री गोकुळ बोरसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रदिप चौधरी सर तर आभार प्रदर्शन सौ किर्ती सोनार मॅडम यांनी केले यशस्वीतेसाठी श्री राहुल पाटील सर , श्री प्रकाश पाटील सर, सागर महाजन सर , श्री दिपक बागुल सर , सौ रुपाली महाजन यांचे सहकार्य लाभले
माऊलींचे जयघोष करीत दिंडी पुन्हा विद्यालयात परत आली.....
रामकृष्ण जयहरि ......🙏🙏