अमळनेर-येथील अँँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे शेकडो वर्षापासून विविध जाती धर्मातील लोकांना वारकरी नावाच्या एका माळेत गुंफुन विवीध संतांच्या प्रबोधनाने,साहित्याने पावन झालेल्या महाराष्ट्राचे लाडके दैवत श्री विठ्ठल पांडुरंगास अभिवादन करण्यासाठी व आजच्या पिढीला आपल्या परंपरा,संस्कृती आणि संतांच्या कार्याची ओळख करुण देण्यासाठी आषाढी एकादशी निमित्ताने पालखी मिरवणुक,भजन,अभंग गायन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.यावेळी विठ्ठल व रुक्मिणी सारखी वेशभूषा साकारलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते .विठ्ठल नामात सर्व दंग झालेले विद्यार्थी,तुळस डोक्यावर धरुन नववारी साडी नेसलेल्या लहान विद्यार्थिनी,वारकरी वेशभुषेचे पांढरे कपडे परिधान करुन गळ्यात टाळ आणि विना धारण करुन चिमुकले विठु नामाचा गजर करत होते.पालखी मधे बसलेल्या विठ्ठल रुक्मिणी ची निघालेली मिरवणुक बघुन जनु साक्षात पंढरपुरचा विठुराया त्या चिमुकल्यांच्या रुपाने परीसरात अवतरला होता असे भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी अनुभवायला मिळाले.
यावेळी संस्थेचे संचालक पराग पाटील आणि प्राचार्य विकास चौधरी यांनी पालखीचे पूजन केले व प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी विठुरायाचे भजन ह्या प्रसंगी सादर केले.शाळेतील शिक्षिका सुरेखा सोनगडकर व जयश्री भोसले यांनी पसायदान सादर केले.सुत्रसंचालन वर्षाली सावंत यांनी केले तर आभार शारदा महिंद यांनी मानले.यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले.