जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी पंकज चौधरी यांची निवड.
मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव!
जिल्हा नियोजन (डी पी डी सी) समितिच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी आ शिरिष दादा चौधरी मित्र परिवाराचे सदस्य तथा सामाजीक कार्यकर्ते पंकज चौधरी यांची शासनाने नियूक्ती केली आहे जिल्ह्यातील १४ सदस्यांची निवड यादीचे आदेश नियोजन विभागाचे ऊपसचिव वि.फ. वसावे यांनी दि ११ जूलै रोजी पारीत केले आहे पंकज चौधरी हे येथील नगरसेविका सौ कल्पना चौधरी व पत्रकार तथा अर्बन बँकेचे संचालक पंडीत चौधरी यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या निवडी बद्दलआ शिरिष चौधरी खा उन्मेश पाटील पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.