अमळनेर प्रतिनिधी-
कळमसरे ता.अमळनेर येथील माजी सरपंच व ह.भ.प.दोधू वामन चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ही बातमी हृदयाला चटका देणारी आहे कळमसरे येथील अत्यंत सोजवळ अभ्यासू समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांची ख्याती होती कळमसरे परिसरात ते अण्णा यांना टोपण नावाने ओळखले जायचे. अण्णांचा स्वभाव प्रेमळ होता त्यांनी आपल्या परिवारातील मुलांवर नातुवर चांगले संस्कार करून त्यांना सुसंस्कृत केले. कळमसरे परिसरात किर्तन भजन कोणताही धार्मिक कार्यक्रम असला त्याठिकाणी अण्णांची विशेष उपस्थिती राहायची. अण्णांचा चांगला स्वभाव व त्यांची सामाजिक कार्याबद्दल ची आवड पाहून कळमसरे येथील ग्रामस्थांनी त्यांच्यावर सरपंच पदाची जबाबदारी टाकली अण्णांनी त्यांच्या काळात यशस्वीपणे सांभाळण्याचे काम केले व गावाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे हे नाकारता येणार नाही अण्णांचा मित्रपरिवाराचा मोठा गोतावळा आहे अण्णांचे घरचे वातावरण धार्मिक स्वरूपाचे होते. अण्णा म्हणजे साधी राहणी उच्च विचारसरणी होते. अण्णांबरोबर मला बीएड झाल्यानंतर विकास सोसायटी मध्ये खत प्रमुखाची जबाबदारी माझ्यावर होती तेव्हा अण्णांनी मला बरेच काही गोष्टी शिकवल्या होत्या अण्णा एक उत्कृष्ट मार्गदर्शक होते. अण्णा जरी आज अचानक अल्पशा आजाराने परमेश्वराने त्यांना हिरावून घेतले पण त्यांचे विचार कायमस्वरूपी आपल्या बरोबर राहतील हे निश्चित!
ह. भ.प.दोधु वामन चौधरी.(माजी सरपंच) वय 81 यांचे आज दि.12 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज सायं. 5 वाजता कळमसरे येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
ते येथील दिनकर चौधरी,वसंत चौधरी,ज्ञानेश्वर चौधरी,सुनील चौधरी यांचे वडील तर,प्रीतम भानुदास चौधरी यांचे आजोबा होते..