Halloween party ideas 2015




सावता माळी एक संत.

 *जन्म* : इ.स. १२५०
 *समाधी* - इ.स.१२९५
*गाव* :  अरण ,तालुका-माढा; जिल्हा-सोलापूर.
 आजोबा- दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होत.  
*पत्नी* - जानाई
*अपत्य* - विठ्ठल आणि नागाताई
*व्यवसाय* - शेती

*सावता नावाचा अर्थ*
        साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. 

*सावता माळी यांचे अभंग लिहिणारे*

     सावता माळी यांनी सेना न्हावी, नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगांत वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. *सावता माळ्याचे अभंग काशीबा गुरव हा लिहून ठेवत असे*

*सावता माळी यांचा एक विचार*

       *ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर जप, तप यांची आवश्यकता नाही तसेच कुठे दूर तिर्थयात्रेला जाण्याचीही गरज नाही; केवळ ईश्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन केल्यास आणि श्रद्धा असल्यास ईश्वर प्रसन्न होतो आणि दर्शन देतो असा विचार त्यांनी मांडला*

*कांदा मुळा भाजी l अवघी विठाबाई माझी ll*

*लसूण मिरची कोथिंबिरी l अवघा झाला माझा हरी॥*


*बालपण*

     सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता.
 *‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात*

*प्रतिज्ञा*

  अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. 
   *‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’* ही त्यांची प्रतिज्ञा होती

*कार्य*

      ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. 

      संत सावता माळी यानी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला.

   धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. 

     सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे सत आहेत. 

     वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. 

      श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले.            
      पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.

       त्यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली.

        धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. 

त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. 

*समाधी:*
     
      यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले

    अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले.
    परंतु या दिनांकाविषयी मतभेद आहेत असे कळते. कालनिर्णय दिनदर्शिकेत सावता माळी यांची पुण्यतिथी २५ जुलै (साल?) अशी दर्शवली आहे.

*गाजलेले अभंग*

‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
     या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते

‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।

      नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्वर भेटतो.
*‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग*
*मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’*

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.