Halloween party ideas 2015


दहावीच्या अंतर्गत गुणखैरातीस चाप,
- लेखीसाठी किमान १६ गुण बंधनकारक?

- भाषा विषयातील प्रकल्पासाठी १० गुण

- समितीचा अहवाल शिक्षणमंत्र्यांना पाठवणार

अमळनेर प्रतिनिधी

येत्या २०१९-२० शैक्षणिक वर्षापासून दहावीत भाषा आणि समाजशास्त्र विषयासाठी पुन्हा अंतर्गत गुण सुरू करण्याबाबात सरकार सकारात्मक असल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र हे गुण देताना लेखी परीक्षेत ८०पैकी किमान १६ गुण मिळवणे बंधनकारक राहील, तसेच भाषा विषयाच्या अंतर्गत गुणात १० गुण प्रकल्पासाठी असतील, तर १० गुणांची तोंडी परीक्षा असेल, असा प्रस्ताव अंतर्गत गुणबाबतच्या समितीने मांडला असून, याचा अंतिम अहवाल लवकरच शिक्षणमंत्र्यांकडे सादर केला जाईल, असे सूत्रांकडून समजते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या वर्षीपासून इयत्ता दहावीला भाषा आणि समाजशास्त्र विषयाला मिळणारे अंतर्गत गुण बंद केले. त्याचा परिणाम म्हणजे यंदा दहावीचा निकाल १२.३१ टक्क्यांनी घटला. त्याच वेळी सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण सुरू असल्याने त्यांचा निकाल चांगला लागला. यामुळे चांगले गुण मिळालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनाही राज्यातील नामांकित ज्युनिअर कॉलेजांत प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. त्यातच अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी-पालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, त्यांनी शिक्षण विभागावर संताप व्यक्त केला. या सर्वांची दखल घेत शालेय शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता नववी ते बारावीची विषयरचना व मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी २५ सदस्यांची समिती स्थापन केली. यासंदर्भातील अहवाल शिक्षण विभागाला १० दिवसांत द्यायचा होता. त्यानुसार समितीची दुसरी व अंतिम बैठक शनिवारी पुण्यात पार पडली. या बैठकीत समिती सदस्यांनी आपली मते नोंदविली असून, सर्व समिती सदस्य सकारात्मक असल्याचे चित्र आहे.

*लवकरच घोषणा*🥵

अंतर्गत गुण देताना खिरापत वाटली जाऊ नये, तसेच मूल्यांकनासाठी काही निकष असावे यासाठी सर्वच आग्रही आहेत. यामुळे भाषा विषयात २० गुणांची केवळ तोंडी परीक्षा न ठेवता १० गुणांचा प्रकल्प ठेवण्याचा विचार समितीने मांडला आहे. तसेच विद्यापीठात ज्या पद्धतीने लेखी परीक्षेत किमान गुणांची अट आहे, त्याचप्रमाणे दहावी व बारावीत अंतर्गत गुण सुरू केले तर लेखी परीक्षेत ८०पैकी किमान २० टक्के म्हणजे १६ गुण मिळवणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल. यामुळे गुणांची खैरात थांबेल, असा विचार समितीने मांडला आहे. याबाबतचा अहवाल तयार होऊन लवकरच शिक्षणमंत्र्यांकडे सादर होईल व यानंतर याबाबतची घोषणा होईल असेही सूत्रांनी स्पष्ट केले.



WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.