अमळनेर प्रतिनिधी
मा.आ.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष प्रणित प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती आंदोलनास मोठे यश मिळाले असून आज रोजी अमळनेर नगरपरिषद मार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात आली.
प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष पंकज पाटील व प्रहार अपंग क्रांती संस्था शहराध्यक्ष योगेश पवार यांनी नोव्हेंबर २०१७ पासून नगरपरिषदेस निवेदन देऊन दिव्यांग बांधवांसाठी ३%निधी राखीव ठेवून तो दिव्यांगांसाठी खर्च करण्यात यावा. यासाठी आंदोलन व लेखी तक्रारी अमळनेर नगरपालिकेत केल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर मा.आ.साहेबराव पाटील यांनी या विषयाचे गांभीर्य बघता नगरपालिकेला मागदर्शन करत लोकनियुक्त नगर अध्यक्षा मा.पुष्पलताताई साहेबराव पाटील व मुख्याधिकारी यांनी सकारात्मक चर्चा करून चालू वित्तीय वर्षा साठी १३४ लाभार्थींना प्रत्येकी ७००० प्रमाणे ९ लाख ३८ हजार रुपये खर्च करून अमळनेर च्या इतिहासात पहिल्यांदा अपंग निधी वाटप करण्यात आला.
अपंग हिताच्या या कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर , संजय चौधरी , प्रहार तालुकाध्यक्ष पंकज पाटील ,प्रहार शहराध्यक्ष योगेश पवार तालुका अध्यक्ष दीपक पाटील,शिवाजी पारधी (प्रहार जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जळगाव) धुळे जिल्हाध्यक्ष शशिकांत सुर्यवंशी , धुळे प्रहार सह खजिनदार व धुळे शहर अध्यक्ष अड कविता पवार यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला .