अमळनेर प्रतिनिधी
खा.शि.मंडळाच्या द्रो.रा.कन्याशाळेच्या ७५ व वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.प्रमुख पाहुण्या म्हणून अंजली पटवर्धन तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.सौ.सुषमा जोशी ह्या होत्या. महत्वाचे म्हणजे दोघीही मान्यवर शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत.१० वि च्या विद्यार्थिनींनी ध्येय निच्चीत करून जीवनात पुढे जावं हे त्यांच्या मनोगतातून मांडलं. शाळेच्या मुख्याध्यापिका जे.के.सोनवणे यांनी शाळेच्या वाटचालीचा अहवाल मांडला.शाळेचे चेअरमन डॉ.बी.एस.पाटील यांनी स्त्री -पुरूषातील सामर्थ्य कसे वेगवेगळे असते, तसेच जीवन जगताना येणाऱ्या मर्यादा विद्यार्थिनींना सांगितल्या.
दहावीच्या विद्यार्थिनींना बक्षीस वाटप करण्यात आले, तसेच वार्षिक फुलवात या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संदेश गुजराथी, हरी भीका वाणी,नीरज अग्रवाल, योगेश मुंदडे,जितेंद्र जैन, कल्याण पाटील, कमल कोचर,माधुरी पाटील,वसुंधरा लांडगे,ज्योती राणे,ए.बी.जैन, भांडारकर कुटुंब व इतर पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे.पाटील तर आभार शाळेचे उपमुख्याध्यापक डी.एच.ठाकूर यांनी मानले.