नंदुरबार येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिक्षकांचा रेन हार्वेस्टिंग उपक्रम.
नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील पर्जन्यमान दिवसेंदिवस कमी होत आहे व त्याचे दुष्परिणाम आता सर्वत्र दिसत आहेत. त्यामुळे वृक्षारोपण सोबतच पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक झाले आहे व त्यांसाठी लोकसहभाग पण तितकाच महत्वाचा आहे. ही बाब हेरुन नंदुरबार जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी ( माध्यमिक व प्राथमिक ) आदरणीय एम. व्ही. कदम यांच्या नेतृत्वाखाली रेन हार्वेरस्टिंग हा उपक्रम जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राबवावा असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काल खांडबारा शाळेचे प्राध्यापक भदाणे यांच्या घरी रेन हार्वेरस्टिंगच्या उपक्रम राबविण्यास काल पासून सुरुवात करण्यात आली व ते करण्याचा दृष्टीने नियोजन करण्यात आले. यावेळी शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी पी महाले, उपाध्यक्ष माधव पटेल, कार्यवाह इसा सैय्यद इसार, जयेश वाणी, चौधरी सर आदी उपस्थित होते....*