कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ला बदनाम करणाऱ्या प्राध्यापक सुधीर भटकर यांना निलंबित करा.
फार्मसी स्टुडंन्ट कौन्सिलनचे कुलगुरूंना निवेदन.
अमळनेर प्रतिनिधी :- कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापिठचे नाव बदनाम करणाच्या प्रा. सुधीर भटकर यांना निलंबित करा अशी मागणी फार्मसी स्टूडेंट कौन्सिल ने केली
आहे.या वेळी कौन्सिल चे अध्यक्ष भूषण भदाने व सहका-यांनी कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांना निवेदन दिले असून त्यात नमूद केले आहे की, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगावच्या जनसंवाद विभागातील विभागप्रमुख प्रा. भटकर यांची ऑडियो क्लिप सर्वत्र व्हायरल झाली आहे. दीड वर्षापूर्वी चे प्रकरण दडपण्यासाठी प्रा.भटकर यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. तसेच
विद्यार्थ्यांच्या गुणात फेरफार केल्याचे उघड झाले आहे. तसेच ही
गोष्ट उघडकीस आल्यानंतर फक्त चौकशी समिती नेमण्यात आली असून समितीत कोणा चा समावेश आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच प्रशासनाकडून ही हे प्रकरण दडपण्या चा प्रयत्न तर
होत नाही ना? आजूबाजूच्या जिल्ह्यातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. मात्र प्राध्यापक च असे माकड चाळे करत असतील तर ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यास कसे या ठिकाणी
पाठवतील? असा प्रश्न निवेदनाद्वारे विचारत प्रा. भटकर यांना तत्काळ निलंबित करावे अशी मागणी केली आहे. यावेळी भुषण संजय भदाने (अध्यक्ष फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य)हर्षल पाटील, प्रदिप पाटील,दर्पन वाघ,बालू पाटील आदी हजर
होते.