स्थानिक रहीवांशानी मानले आभार.
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर शहरातील कोणतीही समस्या असो माजी आमदार साहेबरावदादा पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील प्रश्न सोडल्याशिवाय शांत बसत नाही. हेच त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे.गेल्या काही दिवसापासून साई क्लासेस अमळनेर येथील भैय्यासाहेब मगर व पत्रकार किरण पाटील यांच्या घरासमोर वाहन चालकांना वाहन चालविणे कठीण झाले होते.शेवटी साहेबरावदादा यांच्या पुढाकाराने रस्ता चांगला झाला.
गेल्या अनेक वर्षांपासून भगवा चौकातील प्रलंबित असलेला प्रश्न माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या तत्परतेने मार्गी लागला असून रस्त्यावर पाणी साचून अनेक छोटे मोठे अपघात होत होते यासाठी आता रस्त्यावर पाणी साचणाऱ्या ठिकाणी काँक्रीट करण्यात आले आहे यामुळे पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात होणार आहे यामुळे परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेला धन्यवाद दिले असून माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील नगरसेवक बाबू साळुंखे यांचेही आभार मानले आहेत