धार,मारवड व धानोरा येथे विकास कामांचे झाले भूमिपूजन
अमळनेर प्रतिनिधी
आम्ही स्वतः ग्रामिण भागातील रहिवासी असल्याने येथील जनतेच्या व्यथा आपण जाणून असल्याने ग्रामीण भागातील सर्वागीण विकासासाठी आपन कटिबध्दच राहिलो आहोत, आतापर्यंत तालुक्यातील गांवामध्ये गांवाअंतर्गत रस्ते तसेच सामाजिक सभागृह बांधकामा साठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला असल्याचे मोठे समाधान आपणास असल्याची भावना आ.स्मिता वाघ यांनी विविध विकास कांमाच्या भूमिपूजन तसेच लोकार्पण प्रसंगी व्यक्त केली.
अमळनेर तालुक्यातील धार व मारवड येथे 2515 लेखाशीर्षा अंतर्गत मंजूर रस्ता क्रॉक्रीटीकरण (15 लक्ष) कांमाचे भूमिपूजन व धानोरा येथील आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत (3 लक्ष) तसेच नव्याने 2515 लेखाशीर्षा अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कांमाचे भूमिपूजन आ.स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावे वेळी पंचायत समितिच्या सभापती वजाबाई भील,कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार,पंचायत समिति सदस्य कविता पवार,मारवड सरपंच उमेश साळुंखे,महादु पाटिल,राज टेलर,रविन्द्र पाटिल,उमेश चौधरी,बापू कोळी,डॉ. विलास पाटील,राकेश साळुंखे आदि उपस्थित होते.या विकास कामाबद्दल तिन्ही गावांच्या ग्रामस्थानी आ सौ वाघ यांचे आभार मानले.