गाडी लोहार महासंघ धुळे व अमळनेर गाडीलोहार समाज मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा.
गाडी लोहार समाजाचे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन उद्योजक व्हावे.
डॉ रविंद्र चौधरी
अमळनेर प्रतिनिधी
आज रोजी अंमळनेर याठिकाणी गाडी लोहार महासंघ धुळे व अमळनेर गाडी लोहार समाज मंडळ अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव व विशेष मान्यवरांचा सत्कार समारंभ वाणी मंगल कार्यालय याठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमाला अमळनेर चे आमदार शिरीष चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच हिरा उद्योग समूहाचे चेअरमन रवींद्र चौधरी हे अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर होते यावेळेला आमदारांनी लोहार समाजातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की उच्चशिक्षित होऊन उद्योजक व्हावे व इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा त्याच बरोबर आमचा परिवार व लोहार समाज यांचे घनिष्ठ नाते आहे असे त्यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले व्यासपीठावर गाडी लोहार समाजातील अनेक दानशूर ज्येष्ठ समाज बांधव उपस्थित होते ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला आर्थिक सहकार्य व विद्यार्थ्यांचा फाईल घेऊन व व स्मृतिचिन्ह दिले डॉ. रवींद्र चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात लोहार समाज हा अत्यल्प अल्पसंख्यांक समाज असून देखील देशाच्या जडणघडणीमध्ये लोहार समाजाचे योगदान महत्त्वाचे आहे यावेळेला भगवान विश्वकर्मा प्रतिमापूजन करून समाजातील व व देशातील l जे जे व्यक्ति दिवंगत झालेले त्या सर्वांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश नाईक सिनेट सदस्य उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले समाजातील गरजू महीला यांना शिवण यंत्र दिले गेले 85 विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व फाईल फोल्डर देऊन तसेच प्रमाणपत्र देण्यात आले त्याचबरोबर समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या तीनही राज्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गाडी लोहार महासंघाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मिस्तरी तसेच उपाध्यक्ष सचिव व संपूर्ण मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते अमळनेर गाडी लोहार समाज मंडळ अध्यक्ष प्रा.डी एस लोहार उपाध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासंघाचे कार्याध्यक्ष अमित गोराणे यांनी केले व आभार हेमकांत लोहार यांनी मानले कार्यक्रमासाठी संतोष लोहार , ज्योत्स्ना लोहार व संपूर्ण मंडळाच्या समाज बांधवांनी सहकार्य केले.