३०० महीलांनी पारायणाचा घेतला लाभ.
गजानन भक्तांची मोठी उपस्थिती.
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील मुंदडा नगर मधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरात प्रा विद्याताई पळवळकर यांनी श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायनाचे 627 वे पुष्प आज अमळनेर येथे गुंफण्यात आले.
श्री संत गजानन महाराज महाराज सेवा संस्था अमळनेर च्या वतीने या पारायनाचे आयोजित करण्यात आले होते ,याप्रसंगी संस्थेच्या वतीने भाविकांसाठी , फराळ ,उसाचा रस ,चहा व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी प्रा विद्याताई पळवळकर यांचा हस्ते मंदिराचा आवारात रुद्राक्ष रुपाचे वृक्षारोपण करण्यात आले , यावेळी मोठ्या संख्येने महिला ,पुरुष भाविकांनी मुखोद्गत पारायनाचा लाभ घेतला. अमळनेर परिसरात अश्या प्रकारच्या मुखोद्गत पारायनाचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते ,त्यामुळे भाविकांना वेगळा अनुभव मिळाला.
यशस्वीतेसाठी गजानन महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार ,व सर्व गजानन भक्तांनी परिश्रम घेतले.