Halloween party ideas 2015


सोशल मीडियाच्या माध्यमातून नैतिक मूल्यांचा ऱ्हास 

  वसंतराव पुरके 
माजी शिक्षणमंत्री
 अमळनेर(प्रतिनिधी) खऱ्या समाजव्यवस्थेला गतिमान करायचं असेल तर माणसाला जागं केलं पाहिजे, सध्या तरुण पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला विसरत चालली आहे यातूनच वाचन कमी झाल्याने नैतिक मूल्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे.असे मत वसंत पुरके यांनी येथील कार्यक्रमात केले.
मराठा मंगल कार्यालयात   फिनिक्स सोशल अवेरनेस गृप तर्फे आयोजित तरुणाईचा जागर आणि व प्रजासत्ताक भारताचे नैतिक मूल्य या विषयावर बोलताना केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीताने सुरुवात झाली. सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अमोल माळी यांनी परिचय करून दिला. तर स्वागत गीत वसुंधरा लांडगे यांनी गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल माळी यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक फिनिक्स ग्रुपचे अध्यक्ष ऍड ललिता पाटील यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर एड ललिता पाटील, प्रा शाम पाटील, वसुंधरा लांडगे, पराग पाटील उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ अविनाश खंदारे व आमदार विजय खडसे यांचे सुपुत्र प्रज्ञानंद खडसे उमरखेड जि यवतमाळ 
माजी उपजिल्हाधिकारी एच टी माळी, सेवानिवृत्त प्राचार्य एस आर चौधरी,पी व्ही पाटील,उमेश पाटील,भागवत पाटील,प्राचार्य विकास चौधरी,प्रा प्रकाश महाजन,पत्रकार अविनाश खंडारे,
माजी नगराध्यक्ष नाना चौधरी,माजी जि प सदस्य शिवाजी पाटील आदी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या राष्ट्रगीताने झाला.
यावेळी व्याख्यानात बोलतांना प्रा पुरके म्हणाले की हे शहर येथे सानेगुरुजींचे कर्मभूमी असलेले शहर आहे. काही माणसे स्वतःला झोकून दिलेले असतात देत असतात अशा साने गुरुजींची ही भूमी त्यांना समाज मूल्याधिष्ठित व्हावा यासाठी त्यांनी खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे हे सांगितले मात्र साने गुरुजींना चित्र समाधानकारक वाटलं नाही म्हणून त्यांनी स्वतःला संपवलं. प्रेम कोणालाही आवडतं स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असणारा धर्म माणूस घडवणारा धर्म हवा होता सिद्धांत सांगणारा धर्म हवा होता मूल्य शिक्षण शिक्षण देणारा धर्म हवा होता. मात्र धर्माचा अर्थ वेगळा लावला गेला तुमच्या आयुष्यातील सर्वात उत्कृष्ट कालावधी म्हणजे तारुण्य तारुण्यसुलभ तारुण्य सर्वोत्कृष्ट देणगी असून कधीच संपू नये असे वाटणारी म्हातारी माणसे देखील तारुण्याचा आस्वाद घेतात. सुंदर स्वप्न साकार करायचं आहे येथील थोर कवियत्री बहिणाबाई चौधरींनी नैतिक मूल्यांचा सुंदर असं वर्णन आपल्या विविध कवितांनी केलेले आहे मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला रे हाकला फिरी येती पिकावर असं मनाच वर्णन केल आहे सुंदर जीवन जगण्यासाठी सुंदर स्वप्ने पाहावी लागतात या देशात माणूस घडवणारा धर्म हवा आहे जगाच्या पाठीवर सर्व धर्मात नैतिक मूल्य सांगितले आहेत रोज धर्माच्या नावावर 40 लाख लोकांचे खून होतात तात्कालिक आणि चिरंतन मूल्ये म्हणजे पाच भारतीय मूल्ये आहेत त्यात राष्ट्रीयत्व स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही आहेत. राज्यघटना म्हणजे लोकशाहीचे महाकाव्य असून 288 आमदार कधीही हाती घेताना दिसत नाही भारतीयत्व राष्ट्रीयत्व आयुष्याचा आत्मा प्रेम आहे. प्रत्येक धर्म हा जगा आणि जगू द्या या तत्वावर शिकवण देत असतो पत्रकारितेवर अकारण दबाव आणणे भयानक आहे असे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले तेच काम आता केले जात आहे सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर धर्म शिकवला जात आहे पद येत राहतात जात राहतात पण पत जाता कामा नये. संत तुकारामांच्या अभंगामुळे हा वसंत पुरके व शिक्षणमंत्री झाला असे सांगितले. मी शिक्षण मंत्री असतांना प्रचंड टीका सहन करत शिक्षकांनी माझी तिरडी काढून पत्र लिहून मला नामोहरण करण्याचा प्रयत्न केले. मात्र आपण आयुष्यभर तत्व आणि मूल्य जपले.आणि आयुष्यात डगमगलो नाही.
फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.