गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे
केंद्र प्रमुख
जितेंद्र पवार
अमळनेर प्रतिनिधी
शेळावे ता पारोळा केंद्राची प्रथम शिक्षण परिषद ही जि प प्राथमिक शाळा हिरापुर व जि प प्राथमिक शाळा तांबोळे यांच्या संयुक्त सहभागाने हिरापुर ता पारोळा येथे उत्साहात संपन्न झाली. शिक्षण परिषद ही गुणवत्ता विकासाचा भाग असल्याने सर्व कार्यक्रम व विषय वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात आले.
प्रथम हिरापुर शाळेच्या विदयार्थीनींनी ईशस्तवन व नंतर स्वागत गीत आपल्या गोड आवाजात सादर केले. त्यांना प्रोत्साहन म्हणुन धाबे शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी १५१ रुपये रोख बक्षिस दिले. शिक्षण परिषदेची प्रस्तावना व उद्देश हिरापुर शाळेचे मुख्याध्यापक विजय मेणे यांनी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांच्यासह केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी हिरापुर व तांबोळे शाळेने गिरीष वाणी यांची महाराष्ट्र राज्य पदविधर शिक्षक संघाच्या राज्याध्यक्ष पदी निवड झाली म्हणुन, गुणवंतराव पाटील, पारोळा तालुका शिक्षक संघ तालुकाध्यक्ष म्हणुन, राजवडच्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पाकिजा पटेल यांचे मुकी विदयार्थीनी बोलायला लागली हे संशोधन दिल्लीला गेले व या वर्षी शाळेची पटसंख्या वाढविली आणि जीवन शिक्षण मासिकात लेख प्रसिद्ध करून ३०० रुपयाचे पारितोषिक प्राप्त केले म्हणुन, चिखलोद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ योगिता पाटील यांनी शाळेची पटसंख्या वाढविली म्हणुन मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार व गौरव करण्यात आला.
हिरापुर व तांबोळे शाळेच्या शिक्षकांनी उत्कृष्ट परिपाठ सादर केला.नंतर हिरापुर शाळेच्या शिक्षिका श्रीमती वैशाली सोनवणे यांनी इयत्ता दुसरीच्या भाषा विषयाचा ज्ञानरचनावादावर आधारित आदर्श पाठ सादर केला. विदयार्थ्यांचा प्रतिसाद उत्तम होता. पाठावर सर्वच उपस्थित शिक्षकांनी चर्चा करुन उत्कृष्ट पाठ व शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर असे समाधान व्यक्त केले.तांबोळे शाळेचे उप शिक्षक विनोद पाटील यांनी श्यामची आई या साने गुरुजींच्या पुस्तकाचा नव्याने परिचय करून दिला. ती आई व आधुनिक आई यातील फरक स्पष्ट केला. भाषा अध्ययन निष्पती यावर गट कार्य घेण्यात आले. या कार्यात सर्वच शिक्षकांनी विशेष सहभाग नोंदविला.केंद्राची प्रथमच शिक्षण परिषद असल्यामुळे केंद्रात नव्याने बदलुन आलेले ग्रे मुख्याध्यापिका श्रीमती रत्ना भदाणे, रत्नाकर पाटील, वैशाली बोरसे, वंदना ठेंग, मनिषा नारखेडे, जगदिश पाटील, दयानंद महाजन, हितेंद्र तावडे, केशव बडगुजर यांचा परिचय व स्वागत करण्यात आले. प्रशासकिय मार्गदर्शनात केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांनी परिपाठ आपल्या दारी, दप्तरा विना शाळा-दप्तराचे ओझे कमी करणे, तारखे प्रमाणे रोज पाढे पाठांतर घेणे, शनिवारी इंग्रजी दिवस साजरा करणे, सर्वच विदयार्थ्यांच्या पालकांची भेट घेत राहणे, टॅग प्रशिक्षणाला नियमित उपस्थिती देणे, दहा मिनिटात दहा प्रश्न विचारण्याचा व सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नांचा उपक्रम राबविणे, चला शाळा सुंदर करू हा उपक्रम व शाळेच्या भौतिक सुविधा सुधारणे,शैक्षणिक साहित्य पेटींचा वापर, शैक्षणिक साहित्य निर्मिती आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले व उपाय योजना सुचविल्या. सूत्रसंचलन तांबोळे शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र नांद्रेकर यांनी तर आभार प्रदर्शन हिरापुरचे शशी वाणी यांनी केले. कार्यक्रम यशस्वतेसाठी हिरापुर व तांबोळे शाळेच्या शिक्षकांसह मारुती पवार यांनी परिश्रम घेतले. उत्साह, खेळीमेळीच्या शैक्षणिक वातावरणात ही परिषद संपन्न झाली.
फोटो