विदर्भातील माळी समाजाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश ठाकरे यांची महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळावर उपाध्यक्ष म्हणून निवड
माळी समाजाकडून अभिनंदनाचा वर्षाव.
अमळनेर प्रतिनिधी
अखिल विदर्भ माळी समाजचे संस्थापक ओबीसी व माळी समाजाचे नेते नागपूर मनपा चे नगरसेवक स्थायी समीती चे माजी अधक्ष मा. अविनाश भाऊ ठाकरे यांची महाराष्ट्र राज्य ईतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळ ( ओबीसी महमंडळ) ऊपाधक्ष(राज्यमंत्री दर्जा) * या पदावर मा मुख्यमंत्री यांनी नियुक्ती केली. या महामंडळाचे पदसिध्द अधक्ष ईतर मागासवर्ग सामाजीक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागस प्रवर्ग कल्याण मंत्रालय(ओबीसी मंत्रालय) चे मंत्री असुन उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) या पदावर श्री अविनाश भाऊ ठाकरे यांची नियुक्ति करण्यात आली आहे. अविनाश ठाकरे यांनी माळी समाजाचे राज्यभर संघटन करून त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे याची दखल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन त्यांची ओबीसी महामंडळावर उपाध्यक्षपदी निवड केली.
कळमसरे येथील उपसरपंच व खान्देश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व ओबीसी भाजप सेलचे जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर महाजन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.