अमळनेर ( प्रतिनिधि ) शहरातील सुन्नी दारूल कजा सेवा भावी संस्था च्या वतीने पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांना मेंदू जव्हर लसीकरण ( इंजेक्शन ) चा शिबीर इंदिरा गांधी भवन येथे आमदार स्मिता ताई वाघ यांच्या मुख्य उपस्थित नुकतेच संपन्न झाले
फैजाने चिशतिया बहुउद्देशीय संस्था संचालित सुन्नी दारूल कजा च्या वतीने हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांना लसीकरण व मार्गदर्शन शिबीराचे उदूघाटन आमदार स्मिता ताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कृषीभूषन साहेबराव पाटील भाजपाचे मा जिल्हाध्यक्ष उदय वाघ धुळे येथील साबिर शेख गुफरान हाजी जळगांव हज कमेटी चे इकबाल सर ,खालीद बागवान, कृ उ बा समितिचे सभापति प्रफुल्ल पाटील नगरसेवक मनोज पाटील शितल देशमुख मिलिंद पाटील विक्रांत पाटील सह आदि मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांना चा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आमदार स्मिता ताई वाघ यांनी सर्व हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आणि सर्व हजी यांना आव्हान केले की पवित्र स्थळावर चांगले पावस होवावे अशी प्रार्थना करावी
मेंदू जव्हर लसीकरण शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयातील डाँ ताडे पी एम पाटील सर्व टीमने अनमोल सहकार्य केले या शिबिरात अमळनेर चोपडा पारोळा एरंडोल शिरपूर शिंदखेडा सह आदि तालुक्यातील भाविक उपस्थित होते १५० महिला व पुरुष हाजी यांना मेंदू जव्हर लसीकरण इंजेक्शन देण्यात आले कार्यक्रमाला यशस्वीते साठी फयाज पठान, सत्तार मास्टर, कादर जनाब, शेखा हाजी, सलीम टोपी, इकबाल शेख, फिरोज मिस्तरी, मसुदखा मिस्तरी,हाजी सत्तार शेख,शब्बीर पहेलवान,अखलाख शेख, रफीक मिस्तरी, मोना शेख, आरिफ मेमन, सह आदि बांधवानी परिश्रम घेतले सुत्रसंचालन हाजी मसुदखा कुरैशी यांनी केले