Halloween party ideas 2015


अमळनेरला ढेकूरोडवर गोडाऊन कट्टा ग्रुप तर्फे  वृक्षारोपण...

अमळनेर -प्रतिनिधी 
 येथील शहराबाहेर वृ क्ष लागवड होते पण शहारात वृक्षारोपण होत नाही म्हणून  ढेकूरोड गोडाऊन कट्टा ग्रुपने ढेकूरोडवर रस्त्याच्या दुतर्फा लक्ष्मीनगर ते कृषीनगर काँलनी परिसरात वृक्षांची लागवड केली 
           दिवसेंदिवस पर्जन्यमान घटल्याने व वातावरणात बदल झाल्याने वृक्ष लागवड व संवर्धन करणे काळची गरज आहे.
          समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन वृक्ष लागवड केली पाहिजे.  असे आवाहन सयाजीराव पाटील यांनी गोडाऊन कट्टा  ग्रुपच्या  वतीने केले.
   या पूढे  दरवर्षी  शेकडो झाडे  लावण्याचा संकल्प गोडाऊन कट्टा  ग्रुपच्या   कार्यकत्यांनी हाती  घेतला आहे.
या उपक्रमात परिसरातील तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
      यावेळी   गोडाऊन कट्टा ग्रुपचे राजेश मोरे, सयाजीराव पाटील ,नितीन पाटील ,रविंद्र जाधव ,अविनाश जाधव , चंद्रकांत पाटील , अजय भामरे,योगेश चौधरी,स्वप्निल पाटील ,योगेश संदानशिव ,शुभम शिरसाठ,प्रशांत बागल, योगेश पाटील,बाँबी संदानशिव ,सिध्दांत बोरसे,आकाश मनोरे,मुकेश पाटील,विवेक बागल,दिपक दांडेकर आदी सदस्य उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.