विखरण प्रतिनिधी(कृष्णा महाजन)
सालाबादाप्रमाणे यंदाही विखरण ता.एरंडोल येथील क्षत्रिय माळी समाजाच्या वतीने श्री. संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन माळी समाज मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.सप्ताहाचे हे 8 वर्ष असुन सदर भव्य ज्ञानयज्ञ सोहळा बुधवार दि.24/07/19 ते 31/07/19 पर्यंत चालणार असुन दररोज चा दिनक्रम सकाळी 5 ते 6 -काकड आरती व प्रार्थना भजन,दुपारी 4 ते6 -प्रवचन व हरिपाठ तर संकिर्तन रात्री 9 ते 11 राहिल. ह.भ.प.सौ.अलकाताई महाराज, जळगांव (24/07-बुधवार),युवाकिर्तनकार ह.भ.प.कु.अनिताताई जाधव,बाभळी-पिंपळगांव(25/07-गुरूवारी);ह.भ.प.सौ.सत्यभामाताई भुजंग,डोंबिवली-मुंबई (26/07-शुक्रवार रोजी),तर ह.भ.प.सौ.चंदाताई गायकवाड, खामगांव (27/07-शनिवार),ह.भ.प.सौ.मालतीताई महाराज, बऱ्हाणपूर(28/07-रविवार),युवाकिर्तनकार ह.भ.प.कु.पुजाताई सनसे,पाडळसे (29/07 -सोमवारी) तर ह.भ.प.सौ.प्रतिभाताई भोसले,सोनगीर यांचे(30/07-मंगळवार )रोजी किर्तन असुन ह.भ.प.सौ.इंद्रायणीताई मोरे ,पाथर्डे(नाशिक )यांचे (31/07/19)रोजी सकाळी 9 ते 11 काल्याचे किर्तन होणार असुन महाप्रसादाचा कार्यक्रम सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालेल. तरी सर्व भाविकांनी किर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा,अशी विनंती माळी समाजातर्फे श्री. जयंत महाजन (अध्यक्ष ),श्री. बापुराव पाटील (उपाध्यक्ष ),श्री. चंद्रभान महाजन (सचिव ),श्री. अरूण ओंकार महाजन (सदस्य ),श्री.पांडुरंग सैतान महाजन (सदस्य ),श्री. कृष्णा अरूण महाजन (प्रसिद्धीप्रमुख)यांनी केली आहे.