Halloween party ideas 2015

महाराष्ट्रभुषण 

पंढरीनाथ बोकारे 
यांना सुर्यदत्त एक्सलन्स अवॉर्ड 2019 

मित्रपरीवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव.

नांदेड प्रतिनिधी
पुणे येथिल सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन च्या वतिने देण्यात येणारा सुर्यदत्त एक्सलन्स अवॉर्ड नांदेडच्या नानक साई फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे यांना देण्यात आला असुन सूर्योदय एजूकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.संजय चोरडीया यांच्या हस्ते नांदेड येथे कुसूम सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.डॉ.रावसाहेब शेंदारकर,नरेंद्र चव्हाण, वरिष्ठ पत्रकार राजु वाघमारे (पुणे),जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत मैया यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.. 

पंजाब आणि महाराष्ट्र या दोन राज्यात सांस्कृतिक देवाणघेवाण करत बंधु प्रेम निर्माण करण्यात यशस्वी ठरत असलेली संत नामदेव घुमान यात्रा याच बरोबर विविध सामाजिक उपक्रम बोकारे यांच्या पुढाकारात राबविण्यात येतात. नुकताच त्यांना महात्मा कबिर समता परिषदेने या कार्याचा गौरव म्हणून 'महाराष्ट्राभुषण' पुरस्कार देऊन गौरवण्यात  आले आहे. पुणे येथील नामवंत शैक्षणिक संकुल सुर्यदत्त एज्युकेशनल कॅम्पस च्या वतिने बोकारे यांच्या कार्याचा गौरव करत यावर्षी चा सुर्यदत्त एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात आला.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.