पाचोरा येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले स्मारक च्या नियोजित जागेला माळी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी
जळगाव जिल्हा पदाधिकारी बैठकीत स्मारकाचा ठराव मंजुर
अमळनेर (प्रतिनिधी) पाचोरा येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे नियोजित जागेत स्मारक उभारणी संदर्भात पाचोरा येथील जिल्हा महाबैठकीत ठराव पास करण्यात येऊन महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाचोरा येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या नियोजित स्मारकाच्या जागी (स्थळी) भर पावसात भेटी देऊन माहिती जाणून घेतली.सामाजिक प्रश्नावर सर्व माळी समाज(सर्वपोटजाती)एकवटल्या असल्याचे यावेळी निर्दशनात आले यावेळी प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन प्रदेश संघटक व क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच चे संस्थापक प्रवीण बी.महाजन (अमळनेर) माजी जिल्हा अध्यक्ष विठ्ठल महाजन, पाचोरा ता.अध्यक्ष नाना महाजन,अमळनेर येथील युवक अध्यक्ष शिवाजी महाजन,मुकेश महाजन यांच्या सह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कार्येकर्ते उपस्थित होते यावेळी विठ्ठल महाजन यांनी उपस्थितांना स्मारक स्थळी माहिती दिली. योग्य त्या उपाय योजना करून स्मारक लवकर मार्गी लावण्यात येईल असे उपस्थित पदाधिकारी यांनी माध्यमांना बोलतांना सांगितले.
फोटो:
पाचोरा येथील महात्मा फुले यांच्या नियोजित स्मारकाच्या जागे विषयी माहिती घेतांना प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन प्रदेश संघटक प्रविण बी.महाजन विठ्ठल महाजन आदी