अमळनेर प्रतिनिधी
– आदिवासी तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढते आहे. भूकबळी विविध कागदपत्रांअभावी सुविधांपासून मुकावे लागत आहे. यामुळे आर्थिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी सरकारने समाजास खावटी कर्ज द्यावे, या मागणीसाठी विविध संघटनांतर्फे येथील प्रांत कचेरीवर ८ जुलैरोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात आला.
राजपुत्र एकलव्य सेना, आदिवासी एकता परिषद तसेच विविध संघटनांनी सुभाष चौकातून बसस्थानकमार्गे प्रांत कचेरीवर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व एकलव्य सेनाप्रमुख राज साळवी, जिल्हाध्यक्ष गोविंदा माळी,डॉ रूपेश संचेती,
राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, गावरान जागल्या संघटनेचे प्रा.विश्वास पाटील, आदिवासी एकता परिषदेचे आंनद पवार, प्रा.जयश्री साळुंखे, कॉ.लक्ष्मण शिंदे, कोळी महासंघाचे गोपीचंद निकम, रावसाहेब पवार यांनी केले.