Halloween party ideas 2015


निभोंरा हायस्कुलच्या उपक्रमशील शिक्षक एन.आर.चौधरीचा पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम.

निंबोळी गोळा करून तीन किलोमीटरचा  रस्त्याला केलेले बीजारोपण.
अमळनेर प्रतिनिधी- वृक्षसंवर्धन हे वृक्षारोपण आपेक्षा महत्त्वाचे काम आहे त्यासाठी अगोदर वृक्षारोपण करणे तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्याचे संवर्धन केले तर खऱ्या अर्थाने शासनाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते .आज सगळीकडे एक मूल एक झाड हा कार्यक्रम सुरू असताना निंभोरा येथील माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बी.एस चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे उपक्रमशील शिक्षक एन.आर चौधरी व त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी यांनी निंभोरा गावापासून तीन किलोमीटर रस्त्यावर निबोंळीचे बियाणे टाकून दुतर्फा बीजारोपण केल्या केल्या मुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे. निंभोरा येथील माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पटांगणात सर्व बाजूंनी वृक्ष लागवड केल्यामुळे आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य झालेला आहे यासाठी गावातील शिक्षण प्रेमी नागरिक, पालक
 शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे मोठे सहकार्य लाभत असते.
          माध्यमिक विद्यालय निंभोरा येथील उपक्रमशिल शिक्षक श्री .एन. आर. चौधरी व त्यांच्या इयत्ता नववी च्या विदयार्थी-विदयार्थीनी यांनी पर्यावरण रक्षण व वृक्षारोपण या जाणिवेतून परिसरातील निबांच्या निंबोळ्या गोळा करून अमळगाव ते निंभोरा 3 किमी. रस्त्यावर दोन्ही बाजूस बीजारोपण केले.व पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आमचे ही योगदान आहे हे दाखवून दिले.
                  या कार्य साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. एच. चौधरी यांनी विध्यार्थी व शिक्षक यांचे मार्गदर्शन केले व कौतुक केले.या वेळी व्ही.पी. बोरसे व किरण पाटील, संजय वाडेकर  यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.