श्रीसंत सावता महाराज समाज
भूषण पुरस्कार जाहीर.
सातारा प्रतिनिधी
राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक,
शिक्षणमहर्षी मा कृष्णरावजी इंगळे यांना ह्या वर्षी श्रीसंत सावता महाराज समाजभूषण
पुरस्कार स्वागताध्यक्ष के एस माळी अध्यक्ष सांगोला बँक
वारकरी सांप्रदायाचे बिजेरोपन करणारे संत,साक्षात पांडुरंगाने दर्शन दिलेले एकमेव श्रीसंत सावता महाराज हे माळी समाजाचे दैवत असून त्या तिर्थनगरीतून माळी समाजाचे संघटन व्हावे म्हणून पत्रकार दशरथ कुळधरण यांच्या संकल्पातून त्यांनीच सुरू केलेला
ह्या कार्यक्रमाचे पाचवे वर्षे आहे
दर वर्षी माळी समाजातील सर्वोच्च व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो आणि याबरोबरच
इतर विविध क्षेत्रातील युवा,महिला उद्योग,व्यापार,कृषी अशा सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते यावर्षीच्या
पुरस्कारासाठी विदर्भातील बुलढाणा जिल्यातील जळगाव जामोद येथील राजकीय,सामा
जिक,सांस्कृतिक,शिक्षण क्षेत्रात सर्वोउत्तम कार्य करणारे शिक्षणमहर्षी मा कृष्णरावजी इंगळे यांना श्रीसंत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर करीत असल्याचे माळी समाज प्रबोधिनीचे स्वागताध्यक्ष
के एस माळी अध्यक्ष सांगोला बॅँक सांगोला यांनी जाहीर केलेत
पहिल्या वर्षी मा छगनरावजी भुजबळसो नाशिक,दुसरे वर्ष मा सुधाकरभाऊ गनगणे अकोला तिसरे वर्षे समाजसेवक गो रा खेरनार मुबंई चौथे वर्ष नागपूर चे दांपत्य मा अशोकरावजी मानकर सौ प्रगतीताई मानकर यांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे
या प्रसंगी दशरथ कुळधरण म्हणतात माळी समाजाचे देवतांच्या दर्शनास सर्वानी यावे आणि आपले संघटन व्हावे या हेतूने सुरू केलेल्या कार्यक्रमास सर्वोउत्तम प्रतिसाद माळी समाजाने दिला तेव्हा मी समाजाचे ऋण विसरू शकणार नाही आता एकच नियोजन आहे की सामाजिक कार्य करीत असणाऱ्या युवकांनी समाजाचे नेतृत्व करून समाज संघटित करावे आणि आपला आदर्श समाज घडेल असे कार्य घडावे अशी त्यांची इच्छा आहे ते पुढे म्हणतात युवा पिढी ते कार्य करेल असा त्यांना विश्र्वास आहे
या कार्यासाठी मुबंई किरण झोडगे रामदास डोके नागपूर अशोकजी मानकर,नाशिक बाजीराव तिडके दीपक कुदळे अरुनभाऊ कुदळे,रविकाका बोरावके,कोपरगाव,राजेंद्रजी आंडे अरण येथील भारत आबा शिंदे आणि त्याचे सर्व सहकारी यांनी मोठे सहकार्य केलेत म्हणून आपण कार्यक्रम करू शकलो विशेष म्हणजे सांगोला बॅँकेच्या चेअरमन के एस माळी आणि त्याचा परिवार यांनी दरवर्षी महाप्रसाद आणि कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य करून कार्यक्रम यशस्वी करतात त्याचे ऋण व्यक्त करतो
म्हणून माळी समाज बंधुभगिनींनो
हे पाचवे वर्षे साजरे करताना विशेष आनंद होतो की आपण समाजात एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आपण सर्वांनी स्वीकारून भावीपिढीपुढे आपले संत सावता महाराज दैवत असले पाहिजे म्हणून आज लाखोंच्या भक्तगण येऊ लागले यातच आनंद आहे तेव्हा आपण विनंती आहे आपल्या देवता चरणी दर्शनास येऊन समाज संघटन करू या चला गुरुवार एक आगष्ट 2019 दुपारी 12 वा श्रीक्षेत्र अरण श्रीसंतसावता महाराज समाजभूषण सोहळा कार्यक्रमास जाऊन तिर्थनगरी समधीस्थळी दर्शन घेऊन समाज संघटन करू या
दशरथ कुळधरण
संयोजक
माळी समाज प्रबोधिनी महाराष्ट्र
मो 98503 99149