भाजप-सेना सरकारकडुन लोकशाहीच्या होत असलेल्या गळचेपीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात पाडळसरे धरणावर निषेध व्यक्त केला
अमळनेर प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते पक्षाला रामराम ठोकून भाजप-सेनेत प्रवेश घेताना पहायला मिळत आहे . पण त्यामागे भाजप-सेनेने सत्तेच्या गैरवापर करून नेत्यांवर चौकशीचे दबाव टाकत या नेत्यांना पक्षबदल करण्यास भाग पाडले आहे. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावरील आयकर विभागाने टाकलेला छापा. हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची आॅफर नाकारल्याने हा छापा टाकण्यात आला अशी चर्चा सर्वत्र आहे.
अशा पद्धतीने विरोधी पक्षाच्या नेत्यांना चौकशी च्या दबावाखाली आणुन भाजप-सेना सत्तेच्या गैरवापर करत त्यांना आपल्या पक्षात बळजबरीने सामिल होण्यास भाग पाडून एकप्रकारे हि लोकशाहीची गळचेपच करीत आहेत. अशी भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
याबरोबरच ना.गिरीष महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या अर्थहीन टिकेत "शरद पवार यांच्या बाजूने एकतरी माणुस शिल्लक राहतो का ते बघावं " असे विधान वापरले , त्याला विरोध म्हणून कार्यकर्त्यांनी "आम्ही आहोत शरद पवार यांच्या सोबत तुम्ही त्याची चिंता करू नका " अशी भूमिका त्याठिकाणी मांडत ना. महाजनांविरोधात यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्या आणि मागील पाच वर्षात जलसंपदामंत्र्यांनी पाडळसरे धरणाच्या मुद्याला गांभिर्याने न घेता एक रुपयाही निधी न दिल्याने निषेध व्यक्त केला....या आंदोलनात हर्षल राजपुत, किरण राजपुत , अमोल राजपुत, कुलदीप पवार, धिरज पाटील, राहूल राजपुत, मयुर पाटील, राहुल पाटील, घनश्याम महाजन, महेश दगडु पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.