अमळनेर - लोकशाहीर,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी आज सामाजिक समरसता मंचाच्या वतीने जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. १ ऑगस्ट रोजी प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त आज दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी ६ :३० वाजता प्रा.डॉ.रमेश माने यांचे "साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे- जीवन व कार्य" या विषयावर व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी प्रा.डॉ.विजय तुंटे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी सन्मान करण्यात येणार आहे. येथील मराठी वाड़मय मंडळाच्या कै.रावसाहेब नांदेडकर सभागृहात होणार असलेल्या या कार्यक्रमास रसिक श्रोते, विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक समरसता मंचाच्या वतीने नरेंद्र निकुंभ, प्रा. देवेंद्र तायडे यांनी केले आहे.
---------