वाँँटर कप विजेत्या नगांव खु गावाला रोटरी क्लबच्या वतीने मोफत पाण्याचा यारो प्लांट.
नुकताच त्याचा लोकापर्ण सोहळा झाला.
अमळनेर प्रतिनिधी
सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशन आयोजित स्पर्धेतील तालुका वाॅटर कप-२०१८ विजेते नगाव खु॥ गावात लोकसहभागाने श्रमदानातून जलसंधारणाची उत्तम कामे झाली म्हणून गावाला रोटरी क्लब आँँफ बाॅम्बे यांच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी मोफत आरो प्लांट देण्यात आला, आरो प्लांट मुळे गावक-यांना शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. ह्या जलशुध्दीकरण यंत्राचा गावक-यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा गुरुवार दि.१२|०७|२०१९ आषाढी एकादशीच्या दिवशी रोटरी क्लब आॅफ बाॅम्बे डिस्ट्रिक-३१४१ चे सदस्य अभिषेक सराफ, अखिल सांघी, ताईसो. सौ. प्रेरणा सुशिल बोरसे (प्रथम लोकनियुक्त सरपंच नगाव खु॥) यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी निखिल सोनवणे (रोटरी क्लब आॅफ बाॅम्बे ), हेमंत पाटील (अश्वमेघ संस्था, अमरावती), प्रदीप उजागरे (युरेका फोर्ब्स) व समस्त नगाव खु॥ ग्रामस्थ उपस्थित होते.