अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ आणि मुंदडा फाउंडेशन संचालीत, इंदिरा गांधी विद्या मंदिर, स्व. सौ. पी. एन. मुंदडा माध्यमिक विद्यालय, श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आणि स्व. श्री एम. एस. मुंदडा माध्यमिक विद्यालयाचे सर्व शाळेचे स्वच्छता दूत अर्थात चतुर्थ कर्मचारी यांनी शालेय आवारात एकादशी निमित्ताने एकादश अर्थात अकरा झाडांची तिन्ही ऋतूत सावली देणारे निंब, पिंपळ, वड यांचे रोपन करून लागलीच त्याच्यासाठी संरक्षण जाळया लावण्यात आल्या. आणि शुभम शिरीष मुंदडा व अमेय ओमप्रकाश मुंदडा यांनी सर्वांना प्रत्येक झाड दत्तक देऊन त्यांच्यावर सर्व झाडांची पूर्णपणे वाढ होइपर्यंत देखभाल करण्याची जबाबदारी सोपवली. सदर प्रसंगी नाईक अशोक सैदाने, रविंद्र पाटील, शिवाजी पाटील, धर्मेंद्र पाटील, जगदीश पाटील, प्रमोद महाजन, रविंद्र चौधरी, पियुषकुमार सोनवणे, राहुल पाटील आदी सर्व कर्मचारी उपस्थित होते.