अमळनेर प्रतिनिधी- वाढदिवसानिमित्त अनेक मुलं व मुली भरमसाठ पैसा खर्च करतात पण याला एक अपवाद आहे. राजकुमार झामनदास कोरानी या पालकाने एक सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या मुलाच्या वाढदिवसाला चक्क शाळेला तीन खुर्च्या दिल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
आज दिनांक 13 जुलै दोन हजार एकोणावीस रोजी श्री राजकुमार झामनदास कोरानी यांच्या नातू चिरंजीव कियांश याच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांसोबत प्रथम वाढदिवस साजरा केला व शाळेला भेटवस्तू म्हणून तीन खुर्च्या दिल्या त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस पी महाले व शिक्षक कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले