जि.प उच्च प्राथमिक शाळा,पिंगळवाडे येथे मंगळग्रह मंदिर सेवा संस्था अमळनेर तर्फे 25 विद्यार्थ्यांना दप्तर वितरण...
अमळनेर प्रतिनिधी
मंगळवार दि.23-7-2019 रोजी जि.प.उच्च प्राथ.शाळा,पिंगळवाडे ता.अमळनेर येथे मंगळग्रह सेवा संस्था,अमळनेर तर्फे शाळेतील इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकत असलेल्या 25 विद्यार्थ्यांना दप्तर वितरण पिंगळवाडे गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्रीम.सुमनताई पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.प्रभाकर झोपडू पाटील, मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, पदवीधर शिक्षक प्रविण पाटील, उपशिक्षक रविद्र पाटील, वंदना सोनवणे आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी मंगळग्रह संस्थानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत दप्तर दिल्याबद्दल मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले व त्यांच्या विश्वस्त मंडळाचे मनस्वी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले तर प्रास्ताविक दत्तात्रय सोनवणे यांनी मांडले व आभार प्रदर्शन प्रविण पाटील यांनी केले.