धुळे येथे महिला मेळावा उत्साहात पार
जळगाव धुळे जिल्ह्यातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती,
अमळनेर प्रतिनिधी
आज दिनांक २७ जुलै २०१९ रोजी संत रविदास उद्यान हॉल, देवपुर रोड, जिल्हा धुळे येथे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत *महिला मेळावा पार पडला.
सदर मेळाव्यात धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रसंगी संघटनेच्या वतीने केल्या गेलेल्या कामांचा सविस्तर आढावा देण्यात आला.
कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या मागण्या त्याच बरोबर प्रश्न मांडण्यात आले व त्या अनुषंगाने त्यात्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करत ते सोडविण्यासाठी संघटना कशी तत्पर आहे या बाबत संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी मार्गदर्शन केले.
🏳🌈 आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांना किमान वेतन कायदा लागू करून *दरमहा 18000/-* रूपये वेतन देण्यात यावे.
🏳🌈 कामावर आधारित मिळणाऱ्या मोबदल्यात *तिप्पट* वाढ करण्यात यावी.
🏳🌈 नोकरीची *शाश्वती* मिळाली पाहिजे.
🏳🌈 अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांना *भाऊबीज* देण्यात यावी.आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांना दरमहा ठराविक रक्कम वेतन म्हणून दिली पाहिजे. कामकाज गतीमान होण्यासाठी गटप्रर्वतक व आशा स्वयंसेविकांना लँपटॉप व मोबाईल पुरविण्यात यावेत.
निवडणूकीपूर्व आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांच्या मागण्या शासनाने विनाविलंब पूर्ण करव्यात यासाठी आगामी काळात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीर करावे. अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
मागण्या मान्य न केल्यास पुढील महिन्यात तिव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आजच्या मेळाव्यात अनेक तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी संघटनेत जाहीर प्रवेश घेतला व संघटना बळकट करण्याबाबत आश्वासन दिले.*
*सदर मेळाव्यात सुमारे एक हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांची उपस्थिती होती.*
सूत्रसंचालन सरचिटणीस अँड.गजानन थळे व उपाध्यक्ष युवराज बैसाणे यांनी आभार प्रदर्शन केले. व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील, कार्याध्यक्षा मायाताई परमेश्वर, उपाध्यक्ष युवराज बैसाणे, सरचिटणीस गजानन थळे, प्रतिक्षा क्षीरसागर, भागिरथी पाटील, प्रतिभा देसले, रविंद्र ब्राह्मणे, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे यादी उपस्थित होते.