Halloween party ideas 2015


जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांना तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून अपमानजनक वागणूक.

आज  प्रांताधिकारी यांना निवेदन देणार.

पंधरा दिवसात कारवाई नाही झाल्यास अमर उपोषणाला प्रांताधिकारी कार्यालयासमोर बसणार.

जयश्री पाटील जि.प.सदस्य 

अमळनेर प्रतिनिधी- जिल्हा परिषदेच्या सदस्या सारबेटा ता.अमळनेर येथील दहा ते बारा शेतकऱ्यांच्या दुष्काळी पैशाच्या संदर्भात विचारना करायला गेल्या असता त्यांना तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे त्यांच्या विरोधात उदया राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

            जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील या सारबेटा येथील दहा ते बारा शेतकऱ्यांची दुष्काळाची पैसे मिळाले नसल्याने त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना भ्रमणध्वनीवरून बऱ्याच वेळा फोन केला पण त्यांनी फोन उचलला नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. आज दिनांक 19 जून 2019 दुपारी गेल्या असता तहसीलदार यांनी त्यांना अपमानस्पद वागणूक दिल्याचे सांगितले. जयश्री पाटील यांनी मी आपणास      सारबेटाच्या शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या संदर्भात दहा ते बारा वेळा फोन केला आपण उचलला नाही त्यामुळे मला त्यांच्या कामासाठी यावं लागलं तहसीलदार देवरे म्हणाले की मला दिवसातून हजारो फोन येतात मी कोणाचा फोन उचलायचा हा माझा प्रश्न आहेअसे त्यांनी सांगितले व त्यांना मी  चांगल्या पद्धतीने बोलत असताना तुम्हीे का आल्या तुम्ही कोण आहेत प्रश्न विचारू लागले व मी बोलत असताना मी तुमची शूटिंग करते असे सांगितले यावर जयश्री पाटील पत्रकार परिषद म्हणाल्या की तुमचा मोबाईल तुमची पर्सनल प्रॉपर्टी असू शकते तर माझी शूटिंग करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला एका लोकप्रतिनिधी महिलेला एका तहसीलदार महिलेकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर बाकीचे विचारूच नका असे सांगितले तहसीलदार यांच्या मनमानी कारभारामुळे तहसील कर्मचारीसुद्धा त्रस्त झाले आहेत.अशी सध्या चर्चा अमळनेरात सुरू आहे.

त्या वेळेत कधीही तहसील कार्यालयात नसतात, अनेक ग्रामीण भागातील नागरिक आपल्या कामासाठी चकरा मारतात. त्यांच्या या अपमानास्पद वागणुकाबाबत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी उद्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी, पालकमंत्री, महसूल मंत्री यांनाही निवेदन पाठविले जाणार आहेत. 15 दिवसाच्या आत तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी पक्ष अमळनेर प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेत जि.प.सदस्या जयश्री पाटील यांनी सांगितले.

यासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी 

तहसीलदार ज्योती  देवरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.