*अमळनेर : - येथील प्रताप महाविद्यालयात दि. २७ जुन रोजी विद्यार्थांनी विविध मागण्यांसाठी निदर्शने देते प्राचार्यांना निवेदन देण्यात आले.
ट्युशन फी शासन महाविद्यालयाच्या खात्यावर सरळ टाकत असते. मात्र तरी देखील महाविद्यालय विद्यार्थांकडुन ट्युशन फी घेत असल्याने हा अन्याय आहे. हा अन्याय थांबवावा. प्रताप महाविद्यालयात विद्यार्थी हे बर्याच दुर वरुन प्रवेशासाठी येत असतात म्हणून विद्यार्थी तसेच विद्यार्थींनींसाठी वेगवेगळे २ कॅश काउंटरची व्यवस्था करावी. जेणेकरून विद्यार्थांची दुरावस्था होणार नाही. तसेच महाविद्यालयात मोठे असल्या कारणाने विद्यार्थांची दुरावस्था होते. म्हणून १ स्वतंत्र्य मदत केंद्र सुरू करावे अश्या मागण्यांसाठी निदर्शने व निवेदन देण्यात आले.