अमळनेर येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा....
अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर येथील धनदाई एज्यूकेशन सोसायटी संचलित शांतीनिकेतन प्राथमिक व जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
योग प्रशिक्षक यशवंत सुर्यवंशी सरांनी अतिशय उत्कृष्टरित्या योगासने करून विद्यार्थांना उत्साहित केले.
या प्रसंगी धनदाई कला महाविद्यालयाचे चेअरमन आबासो.व.ता.पाटील व धनदाई एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासो डी.डी.पाटील यांनी देखील सहभाग नोंदवला.
या योगदिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आबासाहेब व.ता पाटील यांनी योग हा व्यक्तीच्या बाह्य व आंतरिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
या प्रसंगी एल.आय.सी उपशाखाप्रबंधक रमेश वानखेडे यांनी कँन्सर कव्हर प्लँन विषयी माहिती दिली. यावेळी
सौरभ जाधव सहाय्यक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते धनदाई माता एज्यूकेशन सोसायटीच्या शांतीनिकेतन प्राथमिक विद्यामंदीर,जय योगेश्वर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय , कला व विज्ञान महाविदयालय ,चित्रकला महाविद्यालय ,I.TI काँलेज आदिंच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी सहभाग नोंदवला.