Halloween party ideas 2015


प्रा जयश्री साळुंखे यांच्या मध्यस्थीने

व गटशिक्षणाधिकारी महाजन यांच्या पत्राने समाधान मैराळे यांचे  आत्मदहन अखेर मागे...

अमळनेर प्रतिनिधी-

बारावीच्या परीक्षेत पेपर फाडल्याचे कारण दाखवून वैशाली मैराळेला चक्क ठरविले डिपार. बोर्डाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान .तिच्या भावाने शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले होते.

८ दिवसात सकारात्मक निकाल न दिल्यास २१ जुनला आत्मदहन करणार.  शिक्षण मंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात वैशालीच्या भावा ने ईशारा दिला होता.या पार्श्वभूमीवर आज दि समाधान आत्मदहन करणार होता परंतु प्रा जयश्री दाभाडे साळुंके यांनी मध्यस्थी करत अमळनेर येथील शिक्षण अधिकारी श्री महाजन यांच्या शी संपर्क साधला.श्री महाजन यांनी नाशिक  शिक्षण विभागीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून सदर प्रकरणात पुन्हा एकदा समिती ची बैठक घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे प्रा जयश्री साळुंखे यांनी समाधान यास सांगितले यांच्या विनंतीला मान देऊन भ्रमणध्वनी वर झालेले बोलणे लेखी स्वरूपात समाधान मैराळे यास दिले त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई न होता समाधान ला सन्मानाने आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेता आला.

            2019 च्या बारावीच्या परीक्षेत वैशाली एकनाथ मैराळे हिचा पेपर फाटल्याचे कारण दाखवून बोर्डाने तिला  चक्क डिपार केल्याचे मार्कशीट मिळाल्यानंतर बोर्डाच्या भोंगळ कारभारामुळे तिचे वर्षे वाया जाण्याची वेळ आलेली आहे याला जबाबदार कोण? असा प्रश्न तिच्या भावाने शिक्षण मंत्र्याला एका पत्राद्वारे केले आहे.

             वैशाली एकनाथ मैराळे, बैठक क्रमांक ७-१२०३२३ ही शैक्षणिक वर्ष २०१८ - १९ मध्ये इयत्ता १२ वी दर्गात शिकत होती. मार्च महिन्यांत तिची परिक्षा झाली. त्यावेळेस तिच्या वर कॉफी केस किंवा कोणत्याही प्रकारची केस झालेली नव्हती. व नाशिक बोर्ड सांगत असलेले कारण की. पेपर फाडलेला आहे मात्र तो पेपर तिने फाडलेला नाही. असे तिने चौकशी वेळी बोर्डात चौकशी अधिका-यांन समोर लिहून दिले होते, व त्यावेळेस चौकशी अधिकारी यांना विचारणा केली असता, त्यांनी नंतर काहीही अडचण येणार नाही असे सांगितले. मात्र दिनाक २८/०५/२०१९ रोजी निकाल लागला असता तिला डिपार दाखवण्यात आले आहे.

            निकाल लागल्यापासून माझ्या बहिणीने स्वतः ला नुकसान पोहचवण्याचे प्रयत्न केलेले आहे. व तिची प्रकृती तेव्हापासून खराब आहे. या आपल्या परिक्षा मंडळाच्या अन्नायकारक निर्णयामुळे ती आपल्या मित्र व मैत्रिणींन कडे सुध्दा जावू शकत नाही .

          तरी वरील पार्श्वभूमीवर आणि विद्यार्थी हित लक्षात घेऊन येत्या काही दिवसात सकारात्मक निर्णय दयावा तसेच निर्णय सकारात्मक न लागल्यास पुन्हा वेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे समाधान मैराळे याने सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.