Halloween party ideas 2015


अखेर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावरील उपोषण मागे..

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन

अमळनेर प्रतिनिधी

काल दि. २० जुन २०१९ रोजी पावसाळी अधिवेशन काळात आझाद मैदान मुंबई येथे संघटनेच्यावतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे “राज्यव्यापी धरणे आंदोलन” आयोजित करण्यात आले होते.

          या आंदोलनाच्या धर्तीवर आंदोलनाची विशेष दखल घेत आज दि. २१ जुन २०१९ रोजी सकाळी ११ वा. मा. आय. ए. कुंदन - सचिव, महिला व बाल विकास विभाग यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले. मा. सचिव मॅडम व संघटनेच्या शिष्टमंडळात सुमारे ४५ मिनीटे झालेल्या चर्चे मध्ये आपल्या सर्व मागण्यांवर सविस्तरपणे चर्चा झालीच पन त्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने केंद्र शासनाची थकीत मानधनवाढ लवकरात लवकर कशी मिळेल तसेच पेन्शनच्या मुद्यावर व सोबत सर्वच मुद्दयांवर शासन सकारात्मक आहे व लवकरात लवकर निर्णय घेत या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन सचिवांनी दिले.

          पुढे बैठकीच्या नियोजित वेळे प्रमाणे ठीक दु. १.०० वा. शिष्टमंडळाने मा. पंकजाताई मुंडे - मंत्री, महिला व बाल विकास विभाग  यांची त्यांच्या *शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये प्रमुख मागण्यांवर विशेष भर देत सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात यांतील काही मुद्दे सोडविण्याबाबत मंत्री महोदयांनी सांगितले.

        आपण आपल्या अनेक निवेदनातुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना *निवृत्ती नंतरही काही रक्कम दरमहा पेंशन स्वरुपात मिळावी* ही मागणी करत होतो. त्यात सुधारणा करत,  सेवानिवृत्ती नंतर मिळणाऱ्या मानधनाच्या निम्मे रक्कम देण्याबाबत तसेच मानधनवाढ थकबाकी सह देण्याबाबत, प्रस्ताव चालू अधिवेशनात मांडून मंजुरीसाठी शासन शर्तीचे प्रयत्न करणार असल्याचे ना.पंकजा ताई यांनी शिष्टमंडळाला चर्चा करताना आश्वासन दिले.

        अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने केलेली मानधनवाढ कोणत्याही कपाती शिवाय लागू करण्याबाबत तसेच *सेवासमाप्ती नंतर मानधनाच्या निम्मे रक्कम देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे ही मा. मंत्री व मा.सचिव यांनी सांगितले.

         शासनाच्या वरील भूमिकेमुळे सेवानिवृत्ती नंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची होणारी हेळसांड थांबेल असा विश्वास संघटनेला आहे. त्यामुळे आता ही आणि यापुढे ही मोठा संघर्ष करावा लागणार आहे. तो करण्याची मानसिकता व तयारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भविष्यात निश्चित पणे करण्याशिवाय पर्याय नाही.

       मा.मंत्री व मा.सचिव या दोघांनी आपल्या संघटनेबरोबर वेगवेगळ्या बैठका* घेऊन सविस्तर पणे चर्चा केली. ही आपल्या साठी अभिमास्पद बाब आहे.

     शिष्टमंडळात अध्यक्षा - मायाताई परमेश्वर, कार्याध्यक्ष - रामकृष्ण पाटील व युवराज बैसाणे, कार्यकर्त्या - सुशिलाताई कोळी, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे यांचा सहभाग होता.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.