आलं इंडिया सेनी सेवा समाज
दिल्लीवतीने दिल्ली येथे
देशातील नवनिर्वाचित माळी
समाज खासदारांचा सत्कार सोहळा 29 जून सकाळी 9 वा
विशेष प्रतिनिधी-
दिल्ली येथील कार्यक्रमास महाराष्ट्राचे शिष्टमंडळ नागपूर
चे मा अशोकराव मानकर यांच्या नेतृत्वाखाली जाणार.
देशभर असलेल्या माळी समाजाचे 14 खासदार 17 व्या लोकसभेसाठी निवडून आलेले आहेत त्यात महाराष्ट्र एक हरयाणा एक,उत्तर प्रदेश दोन बिहार तीन तामिळनाडू चार आसाम दोन राजस्थान एक अशी 14 खासदारांचा सत्कार दिल्ली येथे मा दिलबार सिह सेनी यांच्या अध्यक्षतेखाली आणि शुभहस्ते
भाजपाचे कबीनेट मंत्री उत्तर प्रदेश श्री स्वामी प्रसाद मौर्य जी
यांच्या उपस्थितीत होत आहे या कार्यक्रमास नागपूरचे मा आमदार अशोकराव मानकर उपस्थित राहणार आहे तर विशेष निमंत्रित म्हणून भायखळा मार्केट चे चेअरमन किरण जी झोडगे ज्योती उद्योगसमूह कोपरगावचे रविकाका बोरावके क्रातीसूर्य प्रतिष्ठानचे राधेश्याम चरडे माळी समाज प्रबोधिनीचे दशरथ कुळधरण ,महात्मा फुले बकेचे चेअरमन राजेंद्रजी आंडे उपस्थित राहत असून देशातील 14 खासदारांना फुलवाडा आजच्या समताभूमीवर निमंत्रित करणार आहोत तर महाराष्टवतीने सर्व खासदारांना भेटून शुभेच्छा देत आहोत पुणे येथे महात्मा फुले साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे त्यासाठी मान्यवरां उपस्थिती अपेक्षित आहेत
हा कार्यक्रम सत्यसाई आडीटरियम भीष्म पिताह मार्ग लोधी रोड नवी दिल्ली येथे होत आहे याबाबत महाराष्ट्रमधून मा वनिताताई लोंढे राष्ट्रीय महासचिव प्रदेशाध्यक्ष संदीप नाईक उत्तम काम करत आहे त्यांनी ही विशेष निमंत्रण सर्वाना दिलेले आहे तरी दिल्ली येथील माळी समाजातील खासदार सत्कार सोहळ्यास आपण उपस्थित राहावे अशी विनंती संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे