निरोप व सत्कार कार्यक्रम
अमळनेर प्रतिनिधी
जि प उच्च प्राथ डिजिटल शाळा पळासदळे येथे निरोप व सत्कारांचा कार्यक्रम संपन्न झाला,याप्रसंगी मुख्याध्यापक दिलीप सोनवणे यांनी सर्व स्टाॅपचे गुलाबपुष्पे देवुन नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात राजेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले, पळासदळे शाळेची आण,बाण,शान दयानंद बुधा महाजन यांना सर्व स्टाॅपने निरोप प्रसंगी श्री गणेशाची प्रतिमा,शाल श्रीफळ भेट दिले ,यावेळेस उपस्थित शिक्षक वृंद व विदयार्थी भावनिक झालेत ,एक कर्तव्य दक्ष व विदयार्थी प्रिय व एक चांगला शिक्षकांचा निरोप देत आहोत असा अष्टपैलू शिक्षक परत आपल्या शाळेत कधी येईल,याप्रसंगी केदारेश्वर चव्हाण सर, अशोक ठाकुर सर,यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला,मुख्याध्यापक दिलीप सोनवणे यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले कि ऐसा सहकारी ना मिलेगा दुबारा व अशीच पाखरे येती अन स्मृती देवून जाती दोन दिवसांची रंगत संगत तुमची आमची नाती सर्व वातावरण एकदम सुन्न होते.
आपण म्हणतो ना दुग्धशर्करा योग तो ही या कार्यक्रमात घडून आला प्रदीप चव्हाण सर हे महाजन सरांच्या जागेवर संगणीकृत बदलीने हजर झालेत त्यांचाही सत्कार सर्व स्टाॅपने मोठ्या उत्साहात केला.
दयानंद महाजन सर यांनी आपल्या मनोगतात सर्व्याचे आभार मानून सांगितले कि मुख्याध्यापक व सहकारी मुळेच पळासदळे येथे काम करण्यात मजा आली असे सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.