अनिल बोरनारे यांनी विधानपरिषद सभापती,अर्थमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासमोर मांडली भूमिका
अमळनेर प्रतिनिधी
विधान परिषदेचे सभापती यांच्या अध्यक्षतेखाली अर्थमंत्री मा.श्री. सुधीर मुनगंटीवार शिक्षणमंत्री आशिष शेलार, उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे,विधान परीषद सदस्य नागो गाणार,कपिल पाटील, श्रीकांत देशपांड,निरंजन डावखरे,विक्रम काळे, शिक्षण संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगीताताई शिंदे यांच्या समवेत काल दि.२६ जून २०१९ रोजी विधानभवनातील कक्षा क्र.१४५ मध्ये झालेल्या राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित व तुकड्यावर १ नोव्हेंबर,२००५ पुर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मयोग्यांसाठी जुनी पेंशन योजना तातडीने लागू करावी अशी महत्वपूर्ण मागणी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे विकास पाटील, शब्बीरभाई शेख, एन एम भामरे उपस्थित होते. आयोजित सहविचार सभेतील सर्व आमदारांनी पुढील मागण्या केल्या. राज्यशासनातील १ नोव्हेंबर,२००५ पुर्वी नियुक्त सर्व ग्रामसेवक, कृषीसेवक इ. कर्मचार्यांप्रमाणेच जुनी पेन्शन योजना शिक्षक-शिक्षकेतरांना लागू करावी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मयोग्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणेसाठी नियुक्ती दिनांकच गृहीत धरावी, जुनी पेन्शन योजना लागू करणेसाठी मा.हायकोर्टाचे आदेश की निर्देश याचा विचार करावा. ्जु्नी् पेन्शन योजना लागू केल्यास डिसीपीएस योजनेपेक्षा शासनाचे शेकडो कोटी रुपये वाचतील. राज्याच्या तिजोरीवर अधिक आर्थिक बोजा पडणार नाही.
दिड लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मयोग्यांसाठी शासनाने जुनी पेन्शन योजनेसंबंधी सकारात्मक विचार करावा आणि अन्याय दूर करावा. यावर बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले शिक्षणसचिव, अर्थसचिव,न्याय व विधी सचिव आणि इतर मान्यवर सदस्यांचा अभ्यासगट नेमावा. अभ्यास गटाने तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करावा. शासनाने त्यानंतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. .