शारदा विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे अटल टिकरिंग लॅब मूळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनास वाढ
अमळनेर प्रतिनिधी-
दि 27 जून2019 गुरूवारी शारदा विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे अटल टिकरिंग लॅब मूळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनास वाढ होत आहे यामुळे भूषण हरेसिंग लोधी 10 वी ब यांने इको बायसिकल (बॅटरी )चा शोध लावला या विद्यार्थ्यांला मार्गदर्शन श्री प्राचार्य श्री जी पी बोरसे पर्यवेक्षक श्री पी एस जोशी व विज्ञान शिक्षक श्री एन व्ही ओतारी श्री डी पी माळी व सर्व विज्ञान शिक्षक यांनी केले यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री सुभाष भास्करराव महाजन यांनी ती सायकल चालवून त्या मुलाचे मनोधैर्य वाढविले
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब श्री वसंतराव रामजी महाजन मा जि प सदस्या व प्रथम महिला सरपंच सौ विद्याताई वसंतराव महाजन उपाध्यक्ष तात्यासाहेब श्री वसंतराव दयाराम पाटील कार्याध्यक्ष नानासाहेब श्री सुभाष भास्करराव महाजन सन्मा सर्व संचालक मंडळ प्राचार्य श्री जी पी बोरसे पर्यवेक्षक श्री पी एस जोशी शिक्षक शिक्षिका यांनी त्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.