*डि.आर.कन्या शाळेत करूणा क्लबच्या वतीने बक्षीसवितरण सोहळा.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
डी आर कन्याशाळेत करुणा क्लब तर्फे "करुणा की कथाएँ" राष्ट्रीय परिक्षेचे बक्षीस वितरण समारंभ व करुणा सप्ताह कार्यक्रम संपन्न झाला*
करुणा क्लब , राष्ट्रीय करुणा की कथाएँ परिक्षेला 70 विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता.त्यापैकी 36 विद्यार्थिनीना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.त्यावेळी करुणा क्लबचे महाराष्ट्र प्रमुख कस्तूरीचंद बाफना जळगाव जिल्हा सचिव दिनेश पालवे ,मुख्याध्यापिका जे.के.सोनवणे, उपमुख्याध्यापक डी.एच.ठाकुर,करुणा शिक्षिका एल.व्ही.घ्यार उपस्थित होते.सूत्रसंचालन के.पी.सनेर यांनी तर आभार विनोद कदम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधु भगिनींचे सहकार्य लाभले