साने गुरुजी विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
अनेक तालुक्यातील शाळांचा सहभाग.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
मा गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे साहेब यांच्या आवाहनानुसार आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत सहभागी शाळा साने गुरुजी नुतन माध्य विदयालय , साने गुरुजी कन्या हायस्कूल , साने गुरुजी विद्या मंदीर , जी एस हायस्कुल , डी आर कन्या , सावित्रीबाई कन्या , एनटी मुंदडा, पी एन मुंदडा हाय, अल्फाइज् गर्लस् हाय इ. शाळांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे उद् घाटन - माननीय तहसीलदार प्रदीपजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी पी आय अनिल बडगुजर , संस्थेचे सचिव संदीप घोरपडे ,नुतन माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक एस डी देशमुख,कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे , साने गुरुजी फाउंडेशनचे नरेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.
व त्यांनी सर्वांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत , अधिकारी रावळ साहेब व त्यांची संपूर्ण टीम
यांच्याकडून माहिती जाणून घेतली व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके बघितले.
समारोपाप्रसंगी चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा लाभ विदयार्थांनी घेतला या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री रावळ साहेब यांनी मा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्व सहभागी शाळांचे विदयार्थी व शिक्षकांचे आभार मानले तर संस्थेच्या व विविध शाळांच्या विदयार्थ्यांना स10 ते संध्या5.30 पर्यंत मार्गदर्शन करणारे रावळ साहेब व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार शाळेचे मुख्याध्यापक एस डी देशमुख यांनी मानले.
शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
पहील्या छायाचित्रात सानेगुरुजी शाळेत आपत्कालीन परिस्थीतीचे प्रशिक्षण देतांना.
दुसऱ्या छायाचित्रात तहसीलदार प्रदीप पाटील, संस्थेचे सचीव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सतीश देशमुख, मुख्याध्यापीका अनिता बोरसे.
छाया ईश्वर महाजन अमळनेर