*सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे वाचन प्रेरणादिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.*
*बलुतं हे आत्ममग्न समाजाला लावलेला सुरुंग आहे.
जेष्ठ साहित्यिक भाऊसाहेब देशमुख.*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दया पवार लिखित 'बलुतं' या आत्मकथनाने कष्टकरी व दलित श्रमिकांच्या प्रश्नांची जाण मराठी साहित्य विश्वाला करून दिली!" असा अभिवाचकांचा सूर पू. सानेगुरुजी ग्रंथालय येथे आयोजित वाचनध्यास व "अभिवाचन" या अभिनव कार्यक्रमातून उमटला.
राज्य मराठी विकास संस्था मुंबई व पू. सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय तर्फे दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचनप्रेरणा दिनानिमित्त "अभिवाचन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, "बलुतं या
सुप्रसिद्ध पुस्तकाचे श्रोत्यांसमोर होणारे अभिवाचन परिणामकारक वाचनप्रेरणा देणारे ठरेल!"
साहित्याचळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब देशमुख यांनी बलुतं चे अभिवाचन करीत सामाजिक प्रश्नांची वस्तुनिष्ठ मांडणी दया पवारांच्या आत्मकथानातून झाल्याने बलुतं वेगळ्या धाटणीचे आणि साहित्यविश्वात दलित कष्टकर्ऱ्यांचे जीवनसंघर्षाचे स्थान बलुतं मुळे निश्चित झाले!असे सांगितले
तर नाट्य व साहित्यप्रेमी कार्यकर्ते संदिप घोरपडे यांनीही एका भागाचे अभिवाचन करून ग्रामिण व दलित जिवनातील संघर्ष साहित्यिक विश्वापुढे जसाचा तसा आपल्या मूळ भाषा शैलीत मांडण्यात आल्याने समाजमनाला बलुतं ने हात घातला आहे असे सांगितले
सामाजिक राजकीय चळवळीतील कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी "बलुतं चे माध्यमातून ४० वर्षापूर्वी उपस्थित केलेले सामाजिक व जातीव्यवस्थेस बळी पडलेल्या समाजाचे पिढ्यानपिढ्या आव्हानात्मक संघर्षमय जगणे, मागासवस्त्यांमधील सार्वजनिक आरोग्याचा व पीडित शोषित महिलांचा प्रश्न,व्यवस्थेकडून होणाऱ्या समाजाच्या पिळवणूकीचा प्रश्न यासारखे बलुतं मधून उपस्थित झालेले अनेक प्रश्न
आजही समाजासमोर आव्हानांच्या स्वरूपात उभे आहेत.मराठी साहित्यात कष्टकरी दलितांच्या आत्मकथानाचे सत्र बलुतं मुळे सुरू झाले!'असे सांगितले. लेखक व अभ्यासक प्रा.संदिप नेरकर यांनी बलुतकार दया पवार यांनी कुटुंब व नात्यातील संघर्ष , ग्रामीण समाजविण याबरोबरच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भरकटलेले आंबेडकरी चळवळी चे राजकीय नेतृत्वामुळे समाजाचे न सुटणारे प्रश्न यावर केलेले भाष्य अतिशय मार्मिक व कालानुरूप आजही लागू पडते !स्वातंत्र्य, समता,बंधुता,सामाजिक न्याय या लोकशाही मूल्यांच्या
पुर्ततेचे स्वप्न पाहणारा आशावादी समाज आजही पूर्वी होता त्या परिस्थितीतच दिसत आहे!" असे सांगितले
तर कवि अरुण सोनटक्के यांनी बलुतं हे साहित्याचळवळीत दलितांच्या वेदनांचा साहित्यिक प्रवाहाला वाट निर्माण करून देणारे आत्मकथन ठरले आहे! शोषित समाजाचा साहित्यिक हुंकार बलुतं च्या माध्यमातून मराठी वाङ्ममयविश्वात उमटला !असे सांगितले. अभिवाचन उपक्रमातून वाचक चळवळ वाढविण्यासाठी अभिवाचन उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला असल्याचे
आभार प्रदर्शन संस्थेचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी केले .संचलन सुमित कुलकर्णी यांनी केले.
यावेळी जेष्ठव अभ्यासूवाचक विजय बोरसे , कवि मंगल जाधव यांनी बलुतं बद्दल अभ्यासपूर्ण मत मांडले तर किरण वानखेडे या युवकाने वाचनाचे जीवनातील आवश्यकतेविषयी सांगितले
मनोगत व्यक्त केले.
*"वाचन ध्यास"चे उदघाटन*
सकाळ सत्रात पू. सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय येथे वाचनध्यास उपक्रमाचे औपचारिक उदघाटन करण्यात आले.दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या प्रतिमेचे व पू. सानेगुरुजी यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी उदघाटक समता युवक कल्याण केंद्राचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांनी ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनचारित्र्यातून वाचनाची प्रेरणा घ्यावी वाचनाने जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जळगांव ग.स.बँक संचालक श्यामकांत भदाणे हे होते तर तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.संचालक नगीनचंद लोढा, अनिल घासकडवी आदिसह मान्यवर उपस्थित होते.
*वाचकांसाठी ग्रंथप्रदर्शन ,वाचक गौरव व सलगवाचन उपक्रम*
यावेळी विविध ग्रंथ व पुस्तकांचे प्रदर्शन दालनात लावण्यात आले होते .सलग वाचनासाठी वाचकांसाठी दिवसभर बैठक व्यवस्थेसह आयोजन करण्यात आलेले होते.
तसेच ग्रंथालयातील विविध वयोगटातील नियमित व उत्कृष्ट वाचक कु.गायत्री शिंदे, सौ.पंकजा मोरे, गंगाधर सोनवणे यांचा स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वस्थ चंद्रकांत नगावकर,
संचालक संचालक ईश्वर महाजन,ऍड. रामकृष्ण उपासनी, दिपक वाल्हे, पी.एन.भादलीकर,भिमराव जाधव, आदींसंचालकांसह कर्मचारी
सौ.सीमा धाडकर ,सुरेश जोशी, रमेश सोनार व मधुकर बाळापुरे यांनी परिश्रम घेतले.दिवसभर चाललेल्या दोन सत्रातील वाचनध्यास आणि "बलुतं"
अभिवाचन या अभिनव उपक्रमांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.
फोटो
बालवाचक कु.गायत्री शिंदे हिचा स्मृतीचिन्ह देऊनगौरव करतांना श्यामकांत भदाणे,भाऊसाहेब देशमुख,संदिप घोरपडे, रणजित शिंदे,दिलीप सोनवणे,प्रकाश वाघ ,प्रा.संदिप नेरकर,अरुण सोनटक्के आदि
फोटो
ईश्वर महाजन अमळनेर