अमलनेर तालुका हिंदी शिक्षक मंडल तर्फे पुरस्कार व पारितोषिक वितरण.
तालुक्यातील पाच हजार विद्यार्थी सहभागी.
प्रत्येक गटातील प्रथम विदयार्थीनचा होणार सन्मान.
सेवानिवृत्त गायकवाड हायस्कुलचे शिक्षक किशोर देवरे यांना जीवनगौरव घोषित.
अमलनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुका हिंदी शिक्षक मंडल, पं.स. (शिक्षण) विभाग व यूनियन बँक आँफ इंडिया, शाखा-अमलनेर यांच्या संयुक्तिक विद्यमाने गेल्या १४ सप्टेबर,हिंदी दिवस निमित तालुका स्तरीय ' मातृभाषा - मराठी व राष्ट्रभाषा -हिंदी सामान्य ग्यान स्पर्धा - २०१८' चे आयोजन केले होते त्यात तालुक्यातील शहरी विभागातून १३ व ग्रामीण विभागातून ३३ माध्यमिक विद्यालयातून एकूण ५००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातील इयत्ता ५ वी ते ७ वी तील लहान गटातून एकूण ४१ व ८ वी ते १० वी तील मोठ्या गटातून एकूण ५१ अशा विद्यालय स्तरावरील एकूण ९२ प्रथम विद्यार्थ्यांना पारितोषिक स्वरूपात स्मृति चिन्ह , प्रमाणपत्र व वाचनिय पुस्तक तर , त्याना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांना 'राष्ट्रभाषा-हिंदी कृतिशील शिक्षक' म्हणून स्मृति चिन्ह , प्रमाणपत्र व वाचनिय पुस्तक सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र तसेच मंडलाकडून दरवर्षी तालुक्यातील एक सेवानिवृत्त हिंदी विषय शिक्षकांना दिला जाणारा 'अमलनेर तहसील हिंदी भूषण जिवन गौरव पुरस्कार ' हा ह्या वर्षी कै.दादासाहेब के.डी.गायकवाड़ माध्यमिक विद्यालय, पैलाड, अमलनेरचे सेवानिवृत्त हिंदी शिक्षक श्री. किशोर यशवंतराव देवरे यांना तर ह्या वर्षापासून तालुक्यातील एक कार्यरत हिंदी विषय शिक्षकांना दिला जाणारा 'राष्ट्रभाषा - हिंदी कृतिशील अध्यापक पुरस्कार' जी.एस्.हायस्कूल, अमलनेर चे श्री. भगवान गोविंदा बिरारी यांना दिनांक :- २२ आँक्टोबर,२०१८,मंगलवार रोजी सकाली ठीक ९:३० मिनटांनी तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो. एस्.एस्.पाटिल माध्यमिक विद्यालयात आयोजित भव्यकार्यक्रमात दिले जाणार आहेत तरी, तालुक्यातील सर्व सहभागी विद्यालयाना व हिंदी प्रेमीना उपस्थितिचे अवाहन
अध्यक्ष दिपक पवार, सचीव दिलीप पाटील
आयोजकांकडून करण्यात आले आहे.