देवगांव देवळी हायस्कुलमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रेरक कार्यक्रम संपन्न.
वत्कृत्व स्पर्धा, कथाकथन, प्रकट वाचन स्पर्धाचे आयोजन.
अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल येथे १५आँक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचनप्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात डॉ ए.पी.जे.अब्दुल यांच्या फोटोला अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के होते.वाचन प्रेरणादिनानिमित्त प्रकट वाचन,वत्कृत्व स्पर्धा, कथाकथन यांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यांनी केले.
शाळेतील सर्व विदयार्थीना थोरपुरूषांची पुस्तके देण्यात आली.त्यांना एक तास मुकवाचन करण्यास सांगितले. वाचन प्रेरणादिनानिमित्त वाचनाचे महत्त्व याविषयावर शाळेचे शिक्षक ईश्वर महाजन यांनी मनोगत व्यक्त करून वाचन ही निसर्ग दत्त देणगी असून ते एक प्रयत्न साध्य कौशल्य आहे.असे सांगितले.
महात्मा गांधी जयंती निमित्ताने व शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रज्ञावंत परीक्षा हि सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती या प्रज्ञावंत परीक्षेत पंधरा गुणवंत विदयार्थी व विदयार्थीनीची निवड करण्यात आली.या सर्व प्रज्ञावंतांना वाचन प्रेरणा दिवसाचे औचीत्य साधून श्यामची आई,माझे सत्यांचे प्रयोग, सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप क्रांर्यक्रमांचे अध्यक्ष शाळेचे जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के, शिक्षक आय.आर.महाजन,एस.के.महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
वत्कृत्व स्पर्धेत प्रथम
अश्वीनी माळी(इयत्ता १०वी),द्वितीय माधवी सपकाळे (१० वी),तृतीय विजय कावरे.व कथाकथन स्पर्धेत प्रथम योगिता पाटील(१० वी) द्वितीय विरेंद्र पाटील, तृतीय अभिजीत देवरे यांना वाचनीय पुस्तके देण्यात आली.
अध्यक्षीय भाषणातून जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के म्हणाले कि
माणूस रंगरूपाने नव्हे ,अंतरंगाने मोठा होतो.अंतरंग बहरण्यासाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही, पुस्तके हि मानसिक व वैचारिक भूक भागविण्याचे महान कार्य करतात. असे सांगितले. शेवटी आभार प्रर्दशन एस.के महाजन यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.