देवगांव देवळी येथे जागृत देवस्थान आशापुरी माता.
नवरात्र उत्साहात दर्शनासाठी भावीकांची गर्दी.
आशापुरी देवीच्यामंदिरावर नवरात्रोत्सवानिमित्त रोषणाई
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
: देवगाव- देवळी (ता. अमळनेर) येथील माळी समाजाची कुलदैवत असलेल्या आशापुरी देवीच्यामंदिरावर रंगरंगोटी करुन नवरात्रोत्सवानिमित्त रोषणाई करण्यात आली आहे. सध्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून भाविक दर्शनासाठी येत आहे.
गावातील भाविकांना यापूर्वी शिंदखेडा येथील आशापुरी देवीच्या मंदिरावर नवस फेडण्यासाठी जावे लागत होते. मात्र, गावातील ज्येष्ठ नागरिकांनी गावातच आशापुरी देवीचे मंदिर व्हावे ही इच्छा व्यक्त केली. यास समाजबांधवांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर आशापुरी देवीच्या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. अमळनेर येथील बापू वाणी यांनी या मंदिराच्या बांधकामासाठी मोठी आर्थिक मदतही दिली आहे. सुमारे नऊ ते दहा वर्षापूर्वी भाविकांनी शिंदखेडा येथील आशापूरी देवी मंदिर येथून पायी दिंडी काढून देवगाव- देवळी येथे ज्योत आणली. मंदिराचा जीर्णोद्धार करून गावातच आता भाविक नवस आदी फेडण्याचे कार्य करीत आहेत. शिंदखेडा येथे जाण्याचा वेळही परिसरातील भाविकांचा वाचला आहे. परिसरासह खानदेशातील अनेक भागातील नागरिकही या मंदिरावर दर्शनासाठी येऊ लागले आहेत. मंदिरावर वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जातात. यात नवरात्रोत्सवात नऊ दिवस मातेचा जागर करण्यात येतो. बाळू पाटील, राजू पाटील, छोटू पाटील, कैलास पाटील यांच्यासह ग्रामस्थ मंदिराच्या देखभालीचे काम पाहत आहेत. बन्सीलाल माळी हे दररोज पूजा, साफसफाई तसेच मंदिराच्या परिसराचे काम नियमित पाहतात. गावातील तरुणांचे विकासासाठी सहकार्य लाभत आहे. दरम्यान, बुधवारी (ता. 17) सायंकाळी पाचला होम पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
देवगांव देवळी हे अमळनेर पासून पाच कि.मी.अंतरावर असणारे गाव यात सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत आहे.या गावात माळी समाजातील शेतकरी बांधवाच्या शेतात आळूचे पाने,निंबूच्या बागासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.सध्या पाऊस कमकरता असल्याने बागा नष्ट झाल्या आहेत.आशापुरी मातेच्या मंदिर जागृत देवस्थान असल्याने अनेकांच्या मनातील इच्छा पुर्ण होतात असे भावीकांनी आपल्या इच्छा बोलून दाखविल्या.त्यामुळे अनेक दुरवरचे भावीक नवरात्रात देवीचे दर्शनासाठी येत असतात. त्याठिकाणी मंदीराचे अध्यक्ष व संचालक मंडळ स्वच्छता व इतर सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असतात.
फोटो
देवगांव देवळी ता.अमळनेर येथील जागृत देवस्थान आशापुरी माता
छाया ईश्वर महाजन अमळनेर
-----------